जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 09:56 PM2018-09-27T21:56:08+5:302018-09-27T21:59:32+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी जयपूर, तामिळनाडू, संघमित्रा एक्स्प्रेसमधून दारूच्या १६०५६ रुपये किमतीच्या ३१६ बॉटल जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, दिनेश सिंह, विकास शर्मा, विवेक कनोजिया, कामसिंह ठाकूर, अनिस खान, सुषमा ढोमणे हे दुपारी २.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२९७६ जयपूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी करीत होते. त्यांना एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. बॅगची तपासणी केली असता त्यात दारुच्या ७७०० रुपये किमतीच्या ६२ बॉटल आढळल्या. दुसऱ्या घटनेत दुपारी ३ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसच्या समोरील जनरल कोचमध्ये बेवारस बॅगमध्ये दारूच्या ५९८० रुपये किमतीच्या २३० बॉटल आढळल्या. तिसºया घटनेत प्लॅटफार्म क्रमांक २ वर १२२९६ संघमित्रा एक्स्प्रेसच्या जनरल कोचमध्ये बेवारस बॅगमध्ये दारूच्या २३७६ रुपये किमतीच्या २४ बॉटल आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आली.