जैतपूर ग्रामपंचायतवर नाईक गटाचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:02+5:302021-01-20T04:10:02+5:30
सावनेर : जैतपूर (ता. सावनेर) ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, साेमवारी (दि. १८) निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात ...
सावनेर : जैतपूर (ता. सावनेर) ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, साेमवारी (दि. १८) निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात जैतपूर ग्रामपंचायतवर काँग्रेस समर्थीत नाईक गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे.
या गटग्रामपंचायतमध्ये जैतपूर व सत्रापूर या दाेन गावांचा समावेश करण्यात आला आहे. एकूण सात सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये जैतपूरमधून दाेन तर सत्रापूरमधून पाच सदस्य निवडून दिले जातात. या ग्रामपंचायतच्या बहुतांश निवडणुकांमध्ये काँग्रेस समर्थित दाेन गट आमने-सामने असतात. यावेळच्या निवडणुकीतही तेच चित्र अनुभवायला मिळाले. नाईक गटाच्या अरविंद नाईक व त्यांच्या पत्नी नेहा नाईक यांनी जैतपूर येथील दाेन्ही जागांसाठी तर नेहा नाईक यांनी जैतपूरसाेबतच सत्रापूर येथील एका वाॅर्डमधून निवडणूक लढविली. यात जैतपूर येथील मतदारांनी पती-पत्नीला नाकारले, तर सत्रापूर येथील मतदारांनी नेहा नाईक यांना विजयी केले.
या निवडणुकीत अरविंद नाईक यांचे पाच उमेदवार निवडून आले असून, त्यांच्या विराेधी गटाला (काँग्रेसचाच) दाेन जागा मिळाल्या आहेत. अरविंद नाईक गटातील विजयी उमेदवारांमध्ये नेहा नाईक यांच्यासह अश्विनी अंगराम काकडे, पार्वती नीलकंठ राऊत, प्रकाश नामदेव शेंद्रे व सिंधू ब्रह्मानंद निहारे तर विराेधी गटातील चिरकुट शेषराव कोरसकर व वैशाली नामदेव झाडे यांचा समावेश आहे.