मेहाडिया चौकातील जनता हॉटेल सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:19+5:302021-03-22T04:07:19+5:30
निर्बंध असताना सुरू ठेवले : १३ प्रतिष्ठानांना ७५ हजार दंड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण ...
निर्बंध असताना सुरू ठेवले : १३ प्रतिष्ठानांना ७५ हजार दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने शनिवार, रविवारी हॉटेल बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहे. असे असतानाही मेहाडिया चौकातील जनता हॉटेल सुरू होते. धरमपेठ झोनला याची माहिती मिळताच पथकाने या हॉटेलला सील ठोकले. एनडीएसच्या पथकांनी रविवारी ५३ प्रतिष्ठान, कार्यालयांची तपासणी केली. १३ जणांवर कारवाई करून ७५ हजारांचा दंड वसूल केला.
लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजारांचा दंड वसूल केला, तर जनता हॉटेलला सील ठोकले. हनुमाननगर झोनच्या पथकाने ६ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला.
धंतोली झोनच्या पथकाने ४ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. नेहरूनगर झोनच्या पथकाने ४ प्रतिष्ठानांची तपासणी केली. गांधीबाग झोनच्या पथकाने ४ प्रतिष्ठांनाची तपासणी करून नियमाचे उल्लघन करणाऱ्याकडून ५ हजार तर सतरंजीपुरा झोनच्या पथकाने ३ प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने १० प्रतिष्ठानांची तपासणी केली. आशीतगर झोनच्या पथकाने ७ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या पथकाने ६ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.