जरा हटके : ‘गुगल गौरी’ ला अख्खा भारतीय संविधान मुखपाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 08:44 PM2018-11-13T20:44:29+5:302018-11-13T20:51:48+5:30

भारतीय संविधानाची ३९५ कलमे मुखपाठ असलेली आणि गुगल गर्ल म्हणून ओळख असलेली गौरी मनीष कोढे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गौरीने संविधानावर असलेली कर्तबगारी दाखवित इंडिया व आशिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नाव कोरले होते. त्यापुढे जाऊन कमी वेळात सर्वाधिक वस्तू स्मरणात ठेवण्याचा जागतिक विक्रमही तिच्या नावे नोंदविला गेला. अल्पवयात बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेली ‘गुगल गर्ल गौरी’ बुद्धिमत्ता व कर्तृत्वाच्या जोरावर उपराजधानीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरली.

Jara Hatake: 'Google Gauri' know the whole of the Indian Constitution! | जरा हटके : ‘गुगल गौरी’ ला अख्खा भारतीय संविधान मुखपाठ !

जरा हटके : ‘गुगल गौरी’ ला अख्खा भारतीय संविधान मुखपाठ !

googlenewsNext
ठळक मुद्देबुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाची ओळखइंडिया, एशिया व जागतिक विक्रमालाही गवसणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधानाची ३९५ कलमे मुखपाठ असलेली आणि गुगल गर्ल म्हणून ओळख असलेली गौरी मनीष कोढे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी गौरीने संविधानावर असलेली कर्तबगारी दाखवित इंडिया व आशिया बुक आॅफ रेकार्डमध्ये नाव कोरले होते. त्यापुढे जाऊन कमी वेळात सर्वाधिक वस्तू स्मरणात ठेवण्याचा जागतिक विक्रमही तिच्या नावे नोंदविला गेला. अल्पवयात बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेली ‘गुगल गर्ल गौरी’ बुद्धिमत्ता व कर्तृत्वाच्या जोरावर उपराजधानीच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरली.
भारतीय संविधानाची कलमे लक्षात ठेवणे म्हणजे भल्याभल्यांसाठी अशक्य गोष्ट वाटते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही कलमे स्मरणात ठेवण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात. गौरीने मात्र ही सर्व कलमे भाग आणि परिशिष्टांसह कंठस्थ करून भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले होते. मोटिव्हेशनल स्पीकर असलेली तिची आई वैशाली कोढे एकदा संविधानाचे वाचन करीत होती. गौरीने ऐकूनच ते आत्मसात केले. देशाचा कारभार या पुस्तकाने चालतो, हे आईकडून समजल्यावर कुतूहलाने संविधान वाचनाची आवड व्यक्त केली आणि काही दिवसातच त्यातील प्रत्येक कलम तिला मुखपाठ झाले. पुढे इंडिया व आशियाचा विक्रम आणि अहमदाबादचा जिनिअस पुरस्कारही तिला प्राप्त झाला. माध्यमांच्या कॅमेरांचे लक्ष तिच्याकडे वळले आणि संपूर्ण देशाचे लक्ष तिने वेधले होते. यानंतर कमी वेळात ५० वस्तूंची नावे स्मरणात ठेवून तिने गिनीज बुक आॅफ रेकार्ड स्वत:च्या नावे नोंदविला. गौरीने अभिनेता भरत जाधव व मोहन जोशी यांच्यासोबत एका मराठी चित्रपटात अभिनयही केला आहे.
एकतर संविधान वाचनाची आवड व्यक्त करणे ही मोठी गोष्ट होती. मात्र त्यापुढे जाऊन संविधान पाठ करण्याची अविश्वसनीय किमया गौरीने साधली. पाठांतर करण्याऐवजी तिने संविधान समजून घेतले. संविधान हा आदर्श आणि सर्वोच्च ग्रंथ असल्याचे ती मानते. यातील बालकामगारांसाठीचा कायदा तिला महत्त्वाचा वाटतो. संविधानातील अनेक कायद्यांचा योग्य उपयोग केला जात नसल्याची खंत तिला आहे. उद्योजक बनून अनेकांना रोजगार देण्याची तिची इच्छा आहे आणि देशाचा राष्ट्रपती होण्याचे स्वप्नही मनात आहे. आज ती १३ वर्षांची आहे. आज कॅमेराचा फोकस तिच्याकडे नसला तरी ध्येय गवसल्याचा आत्मविश्वास तिच्याकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे एवढ्याशा वयात जमिनीवर पाय ठेवून उंच भरारी घेण्यासाठी हवे ते परिश्रम घेण्याची जिद्द तिच्यात आहे.

Web Title: Jara Hatake: 'Google Gauri' know the whole of the Indian Constitution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.