‘ओटीटी-स्वस्थ भी, मस्त भी’मध्ये जावडेकर सन्मानित ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:06+5:302021-03-21T04:08:06+5:30

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये पार पडलेल्या ‘ओटीटी-स्वस्थ भी, मस्त भी’ या कार्यक्रमात केंद्रीय सूचना व ...

Javadekar honored in ‘OTT-Swastha Bhi, Mast Bhi’ () | ‘ओटीटी-स्वस्थ भी, मस्त भी’मध्ये जावडेकर सन्मानित ()

‘ओटीटी-स्वस्थ भी, मस्त भी’मध्ये जावडेकर सन्मानित ()

Next

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये पार पडलेल्या ‘ओटीटी-स्वस्थ भी, मस्त भी’ या कार्यक्रमात केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यसभेचे सदस्य व भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राज्यसभा सदस्य पद्मश्री नेत्र विशेषज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी केले होते.

वर्तमानात ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रचंड क्रेझ आहे. या अंतर्गत ज्या वेबसिरिज चालविल्या जात आहेत, त्यावर आतापर्यंत कोणतेच निर्बंध नव्हते. याचा लाभ उचलत अनेक अश्लील, समाजविघातक व्हिडिओ व सिरिज प्रसारित झाल्या. सप्टेंबर २०२० मध्ये एकता कपूर निर्मित सिरिजमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा अपमान करण्यात आला. या विरोधात डॉ. विकास महात्मे यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. दरम्यान, प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच एकता कपूरने क्षमा मागितल्याने वादावर पडदा पडला होता. परंतु, डॉ. महात्मे यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या विरोधात आपले आंदोलन सुरू ठेवले आणि राज्यसभेत हे प्रकरण उचलले. त्याअनुषंगाने प्रकाश जावडेकर यांनी ओटीटीवर निर्बंध आणत कायदा लागू केला. त्याच पार्श्वभूमीवर जावडेकर यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

Web Title: Javadekar honored in ‘OTT-Swastha Bhi, Mast Bhi’ ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.