क्रांतिदिनी झोपडपट्टीवासियांचे 'जवाब दो सरकार' अभियान
By मंगेश व्यवहारे | Updated: August 9, 2023 15:56 IST2023-08-09T15:56:16+5:302023-08-09T15:56:49+5:30
या अभियानांतर्गत जनजागरण सभा घेऊन स्वाक्षरी अभियान सुरू

क्रांतिदिनी झोपडपट्टीवासियांचे 'जवाब दो सरकार' अभियान
नागपूर : शहरातील खाजगी व संयुक्त मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासियांना मालकी पट्टे कधी मिळतील?, असा प्रश्न उपस्थित करीत शहर विकास मंचच्या वतीने क्रांतिदिनानिमित्त शहरातील ९ चौकांमध्ये 'जवाब दो सरकार' अभियान राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत जनजागरण सभा घेऊन स्वाक्षरी अभियान सुरू केले. गिट्टीखदान चौक, रामटेकेनगर चौक, प्रियंकावाडी चौक, त्रिशरण चौक, मुदलीयार चौक, शिवणकरनगर चौक, राणी दुर्गावती चौक येथे हातात तिरंगा घेऊन लोकांनी मालक्की पट्टेची मागणी केली. अभियानाचे नेतृत्व अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, विजय पोहरकर, कवडुलाल नागपुरे, खुशाल लाडे, राजू शाहू, सुधाकर टवळे, राजकुमार तलवारे, शिवशंकर ताकतोडे, धम्मपाल वंजारी, ज्ञानदेव गजभिये, मधुकर हाडगे, राष्ट्रपाल गजभिये, सुलभा गायकवाड, शैलेंद्र वासनिक, सीमा लांडे, कृष्णा बोरकर, जितेंद्र वैरागडे, अश्विन पिल्लेवान आदींनी केले.