जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी; ग्राफिक्स, पेंटिंग आणि शिल्पकलेचे सृजन ‘टुगेदर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:32 AM2019-02-28T11:32:02+5:302019-02-28T11:32:32+5:30
लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या युवा कलावंताच्या प्रदर्शनात ग्राफिक्स, पेंटिंग आणि शिल्पकलेचा संगम जुळवून आणला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या युवा कलावंताच्या प्रदर्शनात ग्राफिक्स, पेंटिंग आणि शिल्पकलेचा संगम जुळवून आणला आहे. नवरगावच्या कला महाविद्यालयात शिकलेल्या या युवा कलावंतांनी आपल्या कल्पना वेगवेगळ्या माध्यमातून कलेतून उतरवून त्या एकत्रित प्रदर्शित केल्याने ‘टुगेदर’ असे नाव या प्रदर्शनाला त्यांनी दिले आहे. प्रदर्शनात कलावंतांनी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ही चित्र, शिल्प साकारली आहे.
इनफिनेट आर्टिस्ट ग्रुपद्वारे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक आनंद कोहली यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे डीन राजा मानकर, सुप्रसिद्ध चित्रकार हेमंत मोहोड व आर्किटेक्ट व इंटेरियर डिजाईनर आरती शहाणे उपस्थित होते. प्रदर्शनात ३५ पेंटिंग, १२ ग्राफिक्स व ५ शिल्प ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनात प्रतीक मुप्पावार, अक्षय रामशेट्टीवार, चंदा वनवे, अक्षय मेश्राम, कृणाल गुज्जनवार, श्वेता पोईनवार, नीरज मार्कंडेवार, प्रणिता रामशेट्टीवार या कलावंताच्या चित्र आणि शिल्पाचा समावेश आहे. या कलावंतांनी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पेंटिंग आणि ग्राफिक्स साकारल्या आहे. प्रत्येकाच्या कलेमध्ये काहीतरी वेगळेपण दिसून येते.