... जय बोलो हनुमान की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:23 PM2018-03-31T23:23:50+5:302018-03-31T23:24:05+5:30
राम लक्ष्मण संग जानकी, जय बोलो हनुमान की..., एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान... अशा पवनपुत्राचे गुणगान करणाऱ्या भजनांच्या गजरात राजाबाक्षाच्या हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण भारताचे ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या आराधनेत लहान थोर उत्साहाने सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले ५० च्या वर आकर्षक चित्ररथ बघण्यासाठी रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राम लक्ष्मण संग जानकी, जय बोलो हनुमान की..., एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान... अशा पवनपुत्राचे गुणगान करणाऱ्या भजनांच्या गजरात राजाबाक्षाच्या हनुमान मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संपूर्ण भारताचे ग्रामदैवत असलेल्या हनुमानाच्या आराधनेत लहान थोर उत्साहाने सहभागी झाले होते. शोभायात्रेत सहभागी झालेले ५० च्या वर आकर्षक चित्ररथ बघण्यासाठी रस्त्यावर लोकांनी गर्दी केली होती.
हनुमानजीची आरती व पूजा झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. मयूर रथावर हनुमानजीची प्रतिमा ठेवण्यात आली होती. आमदार सुधाकर कोहळे, इस्कॉनचे स्वामी अद्वैत प्रभू, नगरसेवक विजय चुटेले, छोटू भोयर, संयोजक विवेक तिवारी यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. शोभायात्रेत आकर्षक चित्ररथाबरोबरच हनुमानाच्या वेशभूषेत बालगोपाल सहभागी झाले होते. शोभायात्रा रामबाग होत कॅपिटल हाईटस्, अजंता चौक, उंटखाना, चंदननगर, मेडिकल चौक, हनुमाननगर, क्रीड़ा चौक, स्मृतिमंदिर रेशीमबाग, तिरंगा चौक, मयूर मंगल कार्यालय, गणेशनगर, नंदनवन बसस्टॉप, गुरुदेवनगर, सक्करदरा चौक, रघुजीनगर, छोटा ताजबाग, अयोध्यानगर, दत्तात्रेयनगर, शारदा चौक, जवाहरनगर, ताजनगर, मानेवाडा रोड, चंद्रमणीनगर, अजनी रेल्वे कॉलनी होत परत राजाबाक्षा मंदिरात पोहोचली.
शोभायात्रेच्या मार्गावर जागोजागी श्रद्धाळूंनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. यातून सामाजिक संदेशही देण्यात आला होता. जागोजागी पुष्पवर्षाव करून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. चित्ररथांमध्ये अयोध्या येथील राममंदिराची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्याचबरोबर रामायणातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते. यावेळी मिहिर मेहता, अभिषेक तिवारी, राधेश्याम राजपूत, हर्षल कुंडे, प्रशांत नागुलवार, विजय पुरोहित, वैष्णवी तिवारी, गीता वाघेला, कांता शर्मा, टिना वैद्य, माया बेन, लता शर्मा आदी उपस्थित होते.