महावितरणच्या संचालक (वित्त) पदी जयकुमार श्रीनिवासन रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:56 PM2018-02-05T22:56:00+5:302018-02-05T22:57:14+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या संचालक (वित्त) पदी मूळचे नागपूरकर असलेले जयकुमार श्रीनिवासन यांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)च्या संचालक (वित्त) पदी मूळचे नागपूरकर असलेले जयकुमार श्रीनिवासन यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे संभाळली आहेत. जयकुमार श्रीनिवासन यांनी नागपूर विद्यापीठातून बी.कॉम. पदवी व त्यानंतर आयसीडब्ल्यूए पूर्ण केले आहे. त्यांनी जून-२०१४ ते जुलै-२०१७ या दरम्यान महानिर्मिती कंपनीचे संचालक (वित्त) या पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली असून आॅगस्ट-२०१७ पासून एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक (वित्त) म्हणून ते काम सांभाळत होते. याशिवाय महागुज कॉलेरी कंपनी लि., यूसीएम कोल कंपनी लि., धोपवे कोस्टल पॉवर लि., महागाम इत्यादी कंपन्यांत त्यांनी अर्धवेळ संचालक म्हणून काम पाहिले आहे. महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या यशस्वी कार्यान्वयात श्रीनिवासन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली असून महानिर्मिती कंपनीत सॅप प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीतही त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.