जेसीआयचा कोरोना योद्धांसाठी प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:26+5:302021-02-10T04:09:26+5:30
या प्रकल्पांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्तीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. प्रीतम चांडक यांनी मार्गदर्शन केले. पोलीस ...
या प्रकल्पांतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्तीवर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात डॉ. प्रीतम चांडक यांनी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख व जेसीआयच्या ऋतुजा मोटघरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मोटघरे यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. देशमुख यांनी हा प्रकल्प व्यापकस्तरावर घेऊन जाण्याचे आवाहन केले. डॉ. चांडक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग याची माहिती दिली. या कार्यक्रमानंतर बजाजनगर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी योगा व ध्यान कार्यशाळा आयोजित करण्यात आली. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. आशिष खंडेलवाल, झोन संचालक डॉ. स्वाती सारडा, योगा मार्गदर्शक डॉ. राधिका वझलवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. दीपिका चांडक यांनी योगाचे महत्व समजावून सांगितले.