भरधाव कारची जीपला धडक

By admin | Published: May 4, 2017 01:58 AM2017-05-04T01:58:55+5:302017-05-04T01:58:55+5:30

भरधाव कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या जीपला जोरदार धडक दिली.

Jeep of the car | भरधाव कारची जीपला धडक

भरधाव कारची जीपला धडक

Next

 नऊ जण गंभीर जखमी : कोंढाळी उड्डाणपुलावर अपघात
कोंढाळी : भरधाव कारने चुकीच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या जीपला जोरदार धडक दिली. यात चार प्रवाशांसह नऊ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना कोंढाळी उड्डाणपुलाच्या उतारावरील विकासनगर टी-पॉर्इंटवर बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
वर्षा सुभाष ढोबाळे (३०), पार्बता चंद्रभान ढोबाळे (७०) दोन्ही रा. सावळी (खुर्द), ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा, माधुरी तातोडे (४०, रा. शाहूनगर, नागपूर), सोनबाजी सोमकुवर (३१, रा. मूर्ती, ता. काटोल) अशी जीपमधील जखमी प्रवाशांची नावे असून, कारमधील अमोल अनिल सावतकर (३७), गौरी अमोल सावतकर (३२), अवंती अमोल सावतकर (५), मधुकर भैयाजी वखरे (६२) व सुमेदा मधुकर वखरे (५५) जखमींची नावे आहेत. सविस्तर असे की, अमोल सावतकर हे आपल्या कुटुंबीयांसह एमएच-४९/बी-४३६४ क्रमांकाच्या कारने नागपूरकडून अमरावतीकडे जात होते.
दरम्यान, कोंढाळी उड्डाणपुलाच्या उतारावर विकासनगर टी-पॉर्इंट येथे एमएच-३१/एजी-६१३५ क्रमांकाची प्रवासी वाहतुकीची जीप चुकीच्या दिशेने समोर आली. यामुळे भरधाव कारची जीपला धडक बसल्याने जीप महामार्गाच्या मधात उलटली तर कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. नागरिकांनी जखमींना जीपबाहेर काढून कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
माहिती मिळताच ठाणेदार प्रदीप चौगावकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जखमींना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी जीपचालक लक्ष्मण खुशालराव बोबडे (४०, रा. चंदनपार्डी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)

 

Web Title: Jeep of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.