कुशल मनुष्यबळासाठी जेटकिंगचे कोर्सेस
By admin | Published: June 20, 2015 02:50 AM2015-06-20T02:50:21+5:302015-06-20T02:50:21+5:30
जेटकिंग कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.
नागपूर : जेटकिंग कॉम्प्युटर हार्डवेअर व नेटवर्किंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीचे इन्स्टिट्यूटचे ध्येय आहे. त्यासाठी संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विविध व्होकेश्नल कोर्सेससाठी सध्या प्रवेश देणे सुरू आहेत, अशी माहिती जेटकिंगचे येथील प्रवर्तक शैलेंद्र वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेतर्फे जेटकिंंग सर्टिफाईड हार्डवेअर नेटवर्किंग इंजिनिअर(जेसीएचएनई प्लस) व मास्टर इन नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशन(एमएनए प्लस)या दोन प्रमुख कोर्सेस सोबत इतर एक व दोन महिन्यांचे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. १२ वी अपिअर किंवा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जेसीएचएनई प्लस हा १२ महिन्यांचा कोर्स सुरू करण्यात आला असून ग्रॅज्युएट व इंजिनिअर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ५ महिन्यांच्या एमएनए प्लस कोर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे, वर्मा म्हणाले.
हार्डवेअर व नेटवर्किंगसोबतच येथील विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास व इं्ग्लिश स्पिकींगचे प्रशिक्षण दिले जाते. यामाध्यमातून आतापर्यंत सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करून नामवंत कंपनीत रोजगार मिळविला आहे. यावर्षी संस्थेने ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे लक्ष ठेवले असून सध्या ६० अॅडमिशन झाल्या असल्याचे ते म्हणाले.
प्रशिक्षणासंदर्भात संस्थेचे टेक्निकल हेड स्वप्नील पांडे म्हणाले, जेटकिंगने कंपन्यांमधील बदलते ट्रेन्ड व गरजा लक्षात घेऊने अभ्यासक्रम तयार केले आहेत. ते सर्व प्रॅक्टिकल ओरिएन्टेड आहेत. सरावासाठी सेपरेट कॉम्प्युटर व लॅब उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबतच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनाही कुशल बनविण्यासाठी संस्थेचे हे कोर्स महत्त्वपूर्ण आहेत. या कोर्सनंतर प्लेसमेंट किंवा जॉब बदलण्यासाठी संस्था विद्यार्थ्यांना ५ वर्षांपर्यंत मदत करते. यावेळी नागपूर शाखेचे प्रमुख अश्विन माकन उपस्थित होते. (वा. प्र.)