राेख रकमेसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:34+5:302021-03-25T04:08:34+5:30
सावनेर : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून ...
सावनेर : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना सावनेर शहरातील वाॅर्ड क्र. १२, मुरलीधर मंदिर परिसरात रविवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास घडली.
सुरेश भय्याजी माटे (६०, रा. मुरलीधर मंदिराजवळ, सावनेर) हे त्यांच्या पत्नीला शस्त्रक्रियेकरिता नागपूरला घेऊन गेले हाेते. दरम्यान, त्यांच्या घरी कुणीच नसताना चाेरट्याने कुलूप ताेडून घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने लाेखंडी कपाटात ठेवलेले १६ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने व राेख दहा हजार रुपये असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर माटे यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार बाेरकर करीत आहेत.