जिजाऊ शोध संस्थान दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र होणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:36 PM2019-08-30T23:36:46+5:302019-08-30T23:37:59+5:30

कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देऊन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र् म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Jijau Research Institute to be the Center for Quality Products: Nitin Gadkari | जिजाऊ शोध संस्थान दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र होणार : नितीन गडकरी

जिजाऊ शोध संस्थान दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र होणार : नितीन गडकरी

googlenewsNext
ठळक मुद्दे‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. कोणतेही कार्य अतिशय बारकाईने करण्याची कला महिलांमध्ये आहे. त्यामुळे कोणतेही उत्पादन तयार करताना त्याचा दर्जा, पॅकेजिंग व मार्केटिंग याकडे विशेष लक्ष देऊन योग्य कार्य केल्यास मनपाचा हा पथदर्शी प्रकल्प दर्जात्मक उत्पादनांचे केंद्र् म्हणून पुढे येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
मनपाच्या धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १५ मधील शंकरनगर येथील जिजामाता सभागृहाजवळ शुक्रवारी ‘जिजाऊ शोध संस्थान’ महिला उद्योजिका भवन प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या प्रज्वला योजनेंतर्गत बचत गटातील महिलांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम वन, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. मलिक्कार्जुन रेड्डी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र्र ठाकरे, सूक्ष्म, लघु व मध्य उद्योग संस्थान नागपूरचे संचालक पी.एस. पार्लेवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी औद्यागिक क्षेत्रातही महिला प्रगती साधतील, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी प्रकल्पाची स्तुती केली.
विजया राहाटकर यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हा, असे आवाहन केले तर महापौर नंदा जिचकार यांनी भगिनींनो पुढे या, धैर्याने वाटचाल करा असे आवाहन केले.
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेविका रूपा राय, नगरसेविका परिणिता फुके, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेविका चेतना टांक, नगरसेवक सर्वश्री सुनील हिरणवार, नागेश सहारे, भगवान मेंढे, प्रमोद कौरती, निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक संचालन नगरसेवक संजय बंगाले यांनी केले.
प्रदर्शन केंद्रासाठी १० कोटी निधी
याच प्रकल्पामध्ये प्रदर्शन केंद्र साकारण्यात यावे. या केंद्रामध्ये ७०० ते ८०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था असलेले सभागृह, अत्याधुनिक उपकरणांचा समावेश, डिजिटल स्क्रीन, राऊंड टेबल कॉन्फरन्स हॉल, ई-लायब्ररी, सौर ऊर्जा पॅनल असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण प्रदर्शन केंद्र साकारण्यात यावे. या केंद्रासाठी वेगळा १० कोटीचा निधी मंत्रालयातर्फे पुरविण्यात येईल, अशी घोषणाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केली. याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी सर्व महिला नगरसेविकांनी आपापल्या प्रभागात महिला प्रशिक्षण कार्यक्रम घ्यावे यासाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाद्वारे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन करीत या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी किर्तीदा अजमेरा यांना देण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.
महिला उद्योजिका भवन प्रकल्पासाठी आणखी १० कोटी - सुधीर मुनगंटीवार
राज्यामध्ये उद्योग भवनाद्वारे विविध कार्य करण्यात येतात. मात्र महिलांसाठी विशेष असे उद्योग भवन राज्यात कुठेच नाही. महापौर नंदा जिचकार यांनी हा प्रकल्प नागपुरात सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. महिलांसाठी स्वतंत्र उद्योग भवन राज्यात प्रथमच साकारले जात आहे. या प्रकल्पासाठी १७ कोटी ४१ लक्ष ९४ हजार ६५६ रुपये निधी प्रस्तावित आहे. आधी यासाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. मात्र महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्रकल्पाला निधी कमी पडू नये यासाठी राज्य सरकारकडून आणखी १० कोटी असा एकूण २० कोटी निधी प्रकल्पासाठी देण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.


जिजाऊ शोध संस्थान प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. व्यासपीठावर बसलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री डॉ. परिणय फुके आदी

Web Title: Jijau Research Institute to be the Center for Quality Products: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.