नागपूरच्या तरुणाईसोबत जॉन, वरुण, जॅकलिनचे आज ‘ढिशूम’
By admin | Published: June 24, 2016 03:04 AM2016-06-24T03:04:47+5:302016-06-24T03:04:47+5:30
लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहेत.
लोकमतचे आयोजन : धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर लुटा आनंद
नागपूर : लवकरच रिलिज होणारा हिंदी चित्रपट ‘ढिशूम’चे कलावंत नागपूरकरांशी भेटायला येत आहेत. यात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आहेत. या कलावंतांची नागपूरकरांसोबत भेट घालून देण्यासाठी लोकमतने आज शुक्रवार, २४ जूनला सायंकाळी ५.३० वाजता काँग्रेसनगरातील धनवटे कॉलेजच्या मैदानावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा मंच खुला असून, हे कलावंत थेट आपल्या फॅनशी भेटणार आहेत.
जॉन, वरुण व जॅकलीनच्या चाहत्यांना त्यांच्याशी थेट घेण्यासाठी लोकमततर्फे ‘ढिशूम मोमेंट’ या आकर्षक स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यासाठी चाहत्यांनी आपल्या जीवनातील ढिशूम क्षणाचा एक फोटो लोकमतच्या फेसबुक पेजवर टॅग करावा. अशा चाहत्यांना या कलावंतांशी भेटण्याची खास संधी मिळणार आहे. हे तिघेही नागपूरकरांच्या खास भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे शुक्रवारची संध्याकाळ धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर शानदार राहणार आहे. धनवटे कॉलेजच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमासाठी हे स्थळ उपलब्ध झाले आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षेच्या कारणास्तव फुटाळा बदलले
जॉन अब्राहम, वरुण धवन व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांच्याशी नागपूरकर तरुणाईला संवाद साधण्याचा योग लोकमतने घडवून आणला आहे. यापूर्वी हा कार्यक्रम फुटाळा तलावावर आयोजित करण्यात आला होता. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव व लोकांच्या सोयीसाठी धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या क्षणाचा तरुणाईने आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.