सहआयुक्त रवींद्र कदम यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:45 PM2018-08-08T23:45:38+5:302018-08-08T23:48:45+5:30
सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी सहपोलीस आयुक्तांचा पदभार स्वीकारला. कदम हे सुद्धा पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याप्रमाणे नागपूरशी परिचित आहेत. शहराला पहिल्यांदाच पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी हे नागपूरशी परिचित असलेले मिळाले.
कदम हे १९८३ मध्ये डीवायएसपी म्हणून पोलीस विभागात रुजू झाले. त्यांनी १९८५ मध्ये मालेगावमध्ये डीवायएसपी म्हणून पोलीस सेवा सुरू केली. यानंतर सहायक पोलीस आयुक्त (सदर), एसआयडी, अतिरिक्त अधीक्षक गडचिरोली, पोलीस अधीक्षक (एसीबी), डीसीपी मुंबई, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, औरंगाबाद आणि पुणे, उपमहानिरीक्षक (एटीएस), उपमहानिरीक्षक (एएनओ), अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) आणि पोलीस महानिरीक्षक पदावर काम केले आहे. परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून १४ जानेवारी २०१७ रोजी त्यांची सहपोलीस आयुक्त पुणे येथे बदली झाली होती.
कदम यांना १९९५ मध्ये भारतीय पोलीस सेवेत सामील करण्यात आले. त्यांनी अनेक वर्षे नक्षलविरोधी अभियानाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अनेक यश प्राप्त केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सहपोलीस आयुक्तांकडे असते. संजय सक्सेना यांच्यानंतर कुणीही या पदावर विशेष पकड बनवू शकले नाही. परंतु येत्या दिवसात ही कमतरता दूर होईल. कदम यांनी बुधवारी सकाळी पदभार स्वीकारला. अप्पर पोलीस आयुक्त श्यामराव दिगांवकर यांनी त्यांचे स्वागत केले.