नागपुरात पत्रकाराची आई व मुलीचे अपहरण करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:02 PM2018-02-18T14:02:50+5:302018-02-18T14:05:32+5:30

नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे.

Journalist's mother and daughter abducted and murdered in Nagpur | नागपुरात पत्रकाराची आई व मुलीचे अपहरण करून हत्या

नागपुरात पत्रकाराची आई व मुलीचे अपहरण करून हत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे हत्येचे कारण गुलदस्त्यात : पत्रकारजगत हादरले


नागपूर : नागपुरातील गुन्ह्यांची मालिका संपता संपत नाही. आता पत्रकारांच्या कुटुंबियांनाही गुन्हेगार टार्गेट करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे पत्रकारच नव्हे तर नागपूर हादरून गेले आहे.
रविकांत कांबळे असे पत्रकाराचे नाव आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपुरातील एका वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले. रविवारी सकाळी १०.३० वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्याने लगेच पोलिसांचा सूचना दिली. दरम्यान शनिवारी सायंकाळीच रविकांत यांनी आई व मुलगी बेपत्ता असल्याची पोलीसात तक्रार दिली होती. त्यनुसार पोलिसांनी रविकांत यांना सूचित केले. ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली.
पत्रकारांवर हल्ले हे होत असतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या आई व मुलीचा खून करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच घटना होय. याबाबत माहिती होताच नागपुरातील पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तनावपूर्ण वातावरण पसरले आहे.

Web Title: Journalist's mother and daughter abducted and murdered in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.