भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास उलगडणार: रामदास आठवले, चित्रपट सुरू करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 09:07 AM2023-10-25T09:07:36+5:302023-10-25T09:14:00+5:30
या वेबसिरीजसाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भीमराव ते बाबासाहेब हा जडणघडणीचा प्रवास उलगडणारी चित्रपट वेबसिरीज सुरू करण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लगेच पत्र देऊ. या वेबसिरीजसाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
यावेळी बार्टीचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त, समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
सोशल इंजिनिअरिंग साधणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य केलेले दादाजी केळूसकर, सुरबा नाना टिपणीस, राजर्षी शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी असलेला सहवास आणि त्यातून दिसून आलेला सोशल इंजिनिअरिंग या उपक्रमामध्ये दिसून येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील ज्या ज्या देशामध्ये जाऊन त्यांनी उच्चशिक्षण घेतले त्यांच्या सहवासाच्या ठिकाणाचा शोध आणि बोध या प्रकल्पाद्वारे घेण्यात येणार आहे.