‘जॉय राईड’चा मार्ग मोकळा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:59 PM2018-03-29T23:59:07+5:302018-03-29T23:59:22+5:30
अनेक दिवसापासून नागपूर मेट्रोतून ‘जॉय राईड’चा आनंद लुटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. येत्या ६ एप्रिलला ‘सीएमआरएस’ (द कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी) चमूचे तीन अधिकारी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण करतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक दिवसापासून नागपूर मेट्रोतून ‘जॉय राईड’चा आनंद लुटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. येत्या ६ एप्रिलला ‘सीएमआरएस’ (द कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी) चमूचे तीन अधिकारी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण करतील.
मेट्रो प्रकल्पाचे सिग्नलिंग आणि टेलिकॉमची तपासणी करून मेट्रोच्या ‘जॉय राईड’चे परीक्षण तसेच सिव्हील, इलेक्ट्रिकल, ट्रॅक्शन, ट्रॅक पाहणी करतील. सीएमआरएसचा हा दौरा अखेरचा असून त्यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि इतर सर्व कार्यरत कर्मचारी तयार आहेत. सीएमआरएसची चमू येण्यापूर्वीच प्रकल्पाचे कार्य पूर्ण झाले असून अखेरच्या टप्प्यातील कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
खापरी मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट साऊथपर्यंत मेट्रोची जॉय राईड असल्यामुळे यामार्गादरम्यान मेट्रो ट्रॅक आणि मेट्रो स्टेशनची पाहणी करून स्ीाएमआरएस आपला पाहणी अहवाल आणि अंतिम निर्णय महामेट्रो नागपूरला सादर करणार आहे. यापूर्वी सीएमआरएसने १६ जानेवारीला नागपूर मेट्रोचा दौरा करून प्रकल्पाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले होते, हे विशेष.
मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेसला टॅक्सी व आॅटोचालकांचे समर्थन
मेट्रो प्रकल्पामुळे ओला, उबेर आणि आॅटोरिक्षाचालकांना भविष्यात प्रवासी सेवेसाठी व्यवसायाच्या जास्त संधी उपलब्ध होणार आहे. मेट्रो स्टेशनच्या पार्किंग परिसरात ओला, उबेर आणि आॅटो रिक्षाचालकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेव्हा मेट्रोतून प्रवास करणाºया नागरिकांना त्यांच्या कार्यस्थळी आणि घरपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ओला, उबेर आणि आॅटो रिक्षाचालकांना करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे फिडर सर्व्हिसेसच्या माध्यमाने नागपूर मेट्रोला टॅक्सी आणि आॅटो रिक्षा व शेअरिंग सायकल यांना एका महाकार्डवर जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो नागपूरतर्फे करण्यात येत आहे. मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेसला टॅक्सी व आॅटो रिक्षाचालकांचे समर्थन आहे. भविष्यात फिडर सर्व्हिसेसच्या माध्यमाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून खासगी वाहनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न महामेट्रो तर्फे केल्या जात आहे. जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल.