चंद्रयान-३ च्या यशानंतर संघ मुख्यालयात जल्लोष; सरसंघचालकांनी व्यक्त केला आनंद

By योगेश पांडे | Published: August 23, 2023 08:44 PM2023-08-23T20:44:35+5:302023-08-23T20:45:01+5:30

आतापर्यंत कुणीही चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरले नव्हते. भारताच्या संशोधकांनी अथक प्रयत्नानंतर हा सन्मान मिळविला आहे.

Jubilation at Union HQ after Chandrayaan-3 success; Sarsangchalak expressed happiness | चंद्रयान-३ च्या यशानंतर संघ मुख्यालयात जल्लोष; सरसंघचालकांनी व्यक्त केला आनंद

चंद्रयान-३ च्या यशानंतर संघ मुख्यालयात जल्लोष; सरसंघचालकांनी व्यक्त केला आनंद

googlenewsNext

नागपूर : चंद्रयान-३ च्या यशस्वी लॅडिंगनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जोरदार जल्लोष करण्यात आला. पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात स्वयंसेवकांनी जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक एकत्रित आले होते. तर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी यावेळी आनंद व्यक्त करत वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.

आतापर्यंत कुणीही चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरले नव्हते. भारताच्या संशोधकांनी अथक प्रयत्नानंतर हा सन्मान मिळविला आहे. संपूर्ण देश त्यांचा ऋणी आहे. त्यांना प्रोत्साहन देणारे शासन, प्रशासन यांचेदेखील आभार मानतो. हे पाऊल केवळ भारतासाठी नसून संपूर्ण जग व मानवतेच्या कल्याणासाठी आहे. संपूर्ण देशात यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. वसुधैव कुटुंबकमचा संदेश देणारा भारत जगाला भौतिक व आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर नेईल, असा विश्वास सरसंघचालकांनी व्यक्त केला.

Web Title: Jubilation at Union HQ after Chandrayaan-3 success; Sarsangchalak expressed happiness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.