१७ जुलै राेजी मंगळ व शुक्र संयाेग पाहण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 10:53 AM2021-07-14T10:53:48+5:302021-07-14T10:54:17+5:30
Nagpur News १७ जुलै राेजी हे दाेन्ही ग्रह सूर्याच्या विरुद्ध दिशेला राहणार असल्याने संयाेजनाचा साेहळा पुन्हा अनुभवता येणार आहे, मात्र हे दर्शन शक्तिशाली टेलिस्काेपनेच शक्य हाेणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अवकाशातील घडामाेडीबद्दल आवड असलेल्यांसाठी एक पर्वणी अंतराळात सुरू आहे. सूर्याभाेवती भ्रमंती करताना एकमेकांजवळ आलेले मंगळ आणि शुक्र ग्रह पाहण्याची संधी पृथ्वी ग्रहावरच्या माणसांना मिळाली आहे. हाेय हे दाेन्ही ग्रह सध्या पृथ्वीच्या जवळून भ्रमंती करीत असून एका रेषेत फिरत असल्याने त्यांना दाेघांना जवळ पाहता येते.
सूर्यास्तानंतर जवळपास ८ वाजताच्या दरम्यान शुक्राचे दर्शन घडेल व त्यानंतर मंगळ पाहता येईल. उल्लेखनीय म्हणजे रात्री १० नंतर गुरू ग्रहाचे सुद्धा दर्शन पूर्वेकडे घेता येईल. मात्र मंगळ व शुक्र या ग्रहांसाठी मंगळवार हा दिवस संयाेजनाचा हाेता. रमण विज्ञान केंद्राचे खगाेलशास्त्र शिक्षक महेंद्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार एकमेकांपासून लक्षावधी किलाेमीटर दूर असले तरी एका रेषेतून भ्रमंती हाेत असल्याने पृथ्वीवरून ते जवळ आल्यासारखे दिसले. यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये असा संयाेग घडणार आहे. यापूर्वी ऑक्टाेबर २०१७ मध्ये हा संयाेग पृथ्वीवरून दृष्टीस पडला हाेता. सध्या मात्र या दाेन्ही ग्रहांना जवळजवळ पाहता येईल. उल्लेखनीय म्हणजे चार दिवसानंतर म्हणजे १७ जुलै राेजी हे दाेन्ही ग्रह सूर्याच्या विरुद्ध दिशेला राहणार असल्याने संयाेजनाचा साेहळा पुन्हा अनुभवता येणार आहे, मात्र हे दर्शन शक्तिशाली टेलिस्काेपनेच शक्य हाेणार आहे.
मंगळ हा पृथ्वीपासून ३७.१९ काेटी किलाेमीटर दूर तर शुक्र ग्रह २१. ३८ काेटी किलाेमीटर दूर आहे आणि हे दाेघे एकमेकांपासून तेवढ्याच अंतर दूर आहेत. मात्र पृथ्वीवरून ते एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येत आहे.
ऑगस्ट महिन्यात शनिचे दुर्लभ दर्शन
खगाेलप्रेमींसाठी येत्या ऑगस्ट महिन्यात अंतराळातील पुन्हा देखण्या ग्रहाला जवळून पाहण्याचा याेग येणार आहे. आपल्या सूर्यमालेतील आणखी एक आकर्षक शनि ग्रहाचे उघड्या डाेळ्याने दर्शन शक्य हाेणार आहे. २ ऑगस्ट राेजी शनि ग्रह सूर्याच्या एकदम विरुद्ध दिशेला राहणार आहे. म्हणजे सूर्य व शनि यांच्या मधाेमध पृथ्वी राहणार आहे म्हणजे पृथ्वी आणि शनि एका बाजूला राहणार आहेत. वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यास्तानंतर ७.४१ वाजता शनिचे अवकाशात दर्शन घडेल व हा साेहळा पहाटे ५.०५ वाजतापर्यंत चालेल. तसे अवकाशात आताही रात्री ११ नंतर शनिचे दर्शन हाेते पण २ ऑगस्टचा क्षण खास असेल. ताे पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने शनिच्या भाेवतालच्या कडाही पाहण्याजाेग्या ठरतील.