घराच्या मालकीवरून महिलांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:16+5:302021-03-05T04:09:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : घराच्या मालकी हक्कावरून महिलांमध्ये चांगलीच जुंपली. वादविवाद, अश्लील शिवीगाळ आणि एकमेकांविरुद्ध मारहाण असा संपूर्ण ...

Jumped into women from home ownership | घराच्या मालकीवरून महिलांमध्ये जुंपली

घराच्या मालकीवरून महिलांमध्ये जुंपली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : घराच्या मालकी हक्कावरून महिलांमध्ये चांगलीच जुंपली. वादविवाद, अश्लील शिवीगाळ आणि एकमेकांविरुद्ध मारहाण असा संपूर्ण तमाशा बुधवारी (दि. ३ मार्च) दुपारी ४.३० ते रात्री ८ वाजेदरम्यान स्थानिक ड्रीम सिटी येथे घडला. या प्रकरणात एकमेकांविरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

माजी पंचायत समिती सदस्या माधुरी संजय भिवगडे (४८, रा. वेकोलि उमरेड) यांच्या तक्रारीनुसार भिवगडे या अन्य काही महिलांना सोबत घेऊन स्वत:च्या ड्रीम सिटी मोहपा मार्गावरील घर रिकामे करण्याच्या कारणावरून गेल्या. या वेळी गैरअर्जदार आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ केली. अंगावरील कपडे फाडून हातबुक्क्यांनी मारहाण केली. अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी बाब त्यांच्या तक्रारीत नमूद आहे. सुभाष देवतळे, गणेश देवतळे, सुनंदा देवतळे, कल्पना देवतळे, दोन मुली आणि अन्य एक मुलगा असे आरोपी आहेत. या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४ (ब), २९४, १४३, १४७, ३२३, ५०४, सहकलम अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात सुनंदा गणेश देवतळे (३२, रा. वायगाव निपानी, ता. जि. वर्धा) यांनीही माधुरी संजय भिवगडे यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. घराच्या मालकी हक्कावरून माधुरी भिवगडे व अन्य १० ते १२ महिला फिर्यादीच्या अंगावर धावल्या. गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या मुलीस मारहाण केली. धमकी दिली. घरातील साहित्य फेकून नुकसान केले. या तक्रारीवरून माधुरी भिवगडे आणि अन्य १० ते १२ महिलांविरुद्ध उमरेड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५२, १४३, १४७, ३२३, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे करीत आहेत.

Web Title: Jumped into women from home ownership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.