जूनमध्ये पाऊस न आल्यास नागपुरात पाणीसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 08:38 PM2019-05-13T20:38:57+5:302019-05-13T20:45:38+5:30

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

In June, if there is no rain, the water scarcity in Nagpur | जूनमध्ये पाऊस न आल्यास नागपुरात पाणीसंकट

जूनमध्ये पाऊस न आल्यास नागपुरात पाणीसंकट

Next
ठळक मुद्दे१० जूनपर्यंत पुरेल इतकाच जलसाठाअनावश्यक पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहनमहापौरांनी पेंच आणि कन्हान प्रकल्पाचा केला दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.
सध्या शहराला दररोज पाणी पुरवठा होत आहे. परंतु शिल्लक जलसाठा विचारात घेता पाण्याचा थेंबही वाया जाऊ नये, याची नागरिकांनी काळजी घ्यावी, पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा,असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यात नागपूर जिल्ह्याच्या काही भागाचा समावेश आहे. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असला तरी नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम ४४.४३९ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रति दिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा हा १० जूनपर्यंतच पुरेल इतका आहे.
निर्माण झालेली परिस्थिती आणि भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काय करता येईल, याची माहिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी सोमवारी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठी नजीकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट दिली. या दोन्ही प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती घेतली. उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापौरांनी केले आहे. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, मनोज गणवीर, उपअभियंता राजेश दुफारे, ओसीडब्ल्यूचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय रॉय, निदेशक के.एम.पी.सिंग, उपनिदेशक संजय कालरा आदी उपस्थित होेते.
कामठीनजीक कन्हान नदीवर असलेल्या कन्हान पाणी पुरवठा केंद्राला भेट दिली असता येथील पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याचे निदर्शनास आले. १५जूनपर्यंतत पाऊस नाही आला तर परिस्थिती अत्यंत गंभीर होणार असल्याची बाबही अधिकाऱ्यांनी महापौरांच्या लक्षात आणली. संभाव्य संकट विचारात घेता यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलावीत, असे निर्देश पिंटू झलके यांनी दिले.
पाणी चोरीला आळा घाला, जपून वापर करा
प्रकल्पात पुरेसा जलसाठा नसल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी दौऱ्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी महापौर कक्षात तातडीची बैठक घेतली. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजित बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते. १० जूनपर्यंत पुरेल इतका साठा असला तरी तो ३० जूनपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. आवश्यक उपाययोजना करून पाण्याच्या चोरीवर निर्बंध घालण्यात यावा. पाण्याचा जपून वापर करण्यासाठी नगरसेवकांच्या माध्यमातून पाणी बचतीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन महापौरांनी केले. नियोजनासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Web Title: In June, if there is no rain, the water scarcity in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.