जरा हटके! बॉडीबिल्डींग स्पर्धा जिंकलेला पहिला ट्रान्सपुरुष; आर्यन पाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 10:38 AM2018-12-08T10:38:31+5:302018-12-08T10:38:56+5:30

एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते.

Just different! The first transman to win bodybuilding competition; Aryan Pasha | जरा हटके! बॉडीबिल्डींग स्पर्धा जिंकलेला पहिला ट्रान्सपुरुष; आर्यन पाशा

जरा हटके! बॉडीबिल्डींग स्पर्धा जिंकलेला पहिला ट्रान्सपुरुष; आर्यन पाशा

googlenewsNext
ठळक मुद्देनायला पाशा ते आर्यन पाशाचा खडतर प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सध्याच्या जिम सॅव्ही पिढीकरिता एखाद्या बॉडीबिल्डींग स्पर्धेत उतरून दुसरे बक्षीस पटकावणे हा काही फार मोठा भाग आता उरलेला नाही. मात्र असे दुसरे बक्षीस पटकावण्याचा मान जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर घेतो आणि तेही भारतात प्रथमच तेव्हा ती आश्चर्याने भुवया उंचावणारी बाब ठरते.
अलीकडेच म्हणजे १ डिसेंबर रोजी आर्यन पाशा या २६ वर्षीय तरुणाने नवी दिल्ली येथे आयोजित बॉडीबिल्डींग स्पर्धेत हा पराक्रम करून दाखवला आहे.
व्यवसायाने वकील असलेल्या आर्यन पाशाची कहाणी ही नायला पाशा या मुलीच्या नावापासून सुरू होते.
सहा वर्षांच्या नायलाने जेव्हा शाळेत जाण्यासाठी मुलांचा गणवेश घालण्याचा हट्ट धरला, तो तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी पहिला प्रसंग होता, तिच्यातले वेगळेपण समजून घ्यायचा. पण जवळपास सर्वच ट्रान्सजेंडर्सच्या आयुष्यात घडते तसे नायलाच्याहीबाबतीत घडले. कुटुंबियांनी तिला मुलांचे कपडे घालण्यास नकार दिला. पुढे वेगवेगळ््या क्रीडास्पर्धांमध्ये तिच्यातील चुणूक सर्वांना समजत गेली. मात्र तिला स्त्रियांच्या कॅटेगरीत भाग घेऊन स्पर्धेत उतरणे मान्य होत नव्हते.
पुढे होणारे शारीरिक बदल तिला अधिकच नैराश्य देत राहिले. मात्र तिच्या आईने तिच्यातील हे बदल ओळखून तिला ट्रान्सजेंडर होण्याचा सल्ला दिला. वयाच्या १८ व्या वर्षी तिने दोन मोठ्या लिंग परिवर्तनाच्या शस्त्रक्रियांना तोंड दिले आणि ती अखेरीस पुरुष बनली. या खडतर प्रवासात तिला कुटुंबाने पूर्ण सहकार्य दिले. नायलाचा आर्यन बनला.
यानंतर आपले शिक्षण पूर्ण करीत आर्यनने वकिलीची पदवी घेतली. सोबतच आपली बॉडीबिल्डींगची आवड जोपासत शरीरयष्टी कमवित राहिला. त्यावर पहिले सामाजिक शिक्कामोर्तब या स्पर्धेने केले आहे. १२५ पुरुषांमधून दुसरा क्रमांक पटकावत आर्यनने आपल्या मेहनत व जिद्दीचा परिचय जगाला करून दिला आहे.

Web Title: Just different! The first transman to win bodybuilding competition; Aryan Pasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.