जरा हटके; भारतातील पहिली टॅक्सीड्रायव्हर ट्रान्सजेंडर, मेघना साहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:10 PM2018-10-31T12:10:31+5:302018-10-31T12:12:01+5:30

ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे भारतातील पहिली ट्रान्सजेंडर ओला कॅब ड्रायव्हर मेघना साहूने एलजीबीटी समुदायाला सन्मानाने व मुख्य प्रवाहात येऊन जगण्याचा एक नवा मार्ग खुला करून दिला आहे.

Just different; India's first Transgender taxi driver, Meghna Sahu | जरा हटके; भारतातील पहिली टॅक्सीड्रायव्हर ट्रान्सजेंडर, मेघना साहू

जरा हटके; भारतातील पहिली टॅक्सीड्रायव्हर ट्रान्सजेंडर, मेघना साहू

Next
ठळक मुद्देएमबीएची पदवी घेतलीमहिला प्रवाशांना जास्त सुरक्षित वाटते

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे भारतातील पहिली ट्रान्सजेंडर ओला कॅब ड्रायव्हर मेघना साहूने एलजीबीटी समुदायाला सन्मानाने व मुख्य प्रवाहात येऊन जगण्याचा एक नवा मार्ग खुला करून दिला आहे.
ओडिशा हे राज्य ट्रान्सजेंडरच्या प्रगतीच्या क्षेत्रात बरेच पुढारलेले राज्य आहे. येथे ट्रान्सजेंडर्सकरिता अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
मला नेहमीच्या पठडीतील कामे करायची नव्हती. गाणे म्हणणे, टाळ््या वाजवणे, पैसे गोळा करणे.. यापेक्षा काहीतरी वेगळं, जे सगळे स्त्रीपुरुष करू शकतात असं काम करायचं होतं. म्हणून मग मी ओला कॅब ड्रायव्हरची नोकरी करण्याचं ठरवलं, असं ३३ वर्षीय मेघनाने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. मला पुरुषप्रधान कार्यक्षेत्रात जाऊन आपलं अस्तित्व सिद्ध करायचंच होतं. आम्हाला फक्त संधीची गरज आहे, आम्ही सर्व कामे चोखपणे करू शकतो.
मेघना ही भारतातील पहिली ट्रान्सजेंडर टॅक्सीड्रायव्हर आहे की नाही याला सध्या तरी काही प्रमाण नाही. मात्र ज्या कंपनीची ती टॅक्सी चालवते त्या कंपनीने व ट्रान्सजेंडर्सच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सहोदरी फाऊंडेशनने तिला तो सन्मान देऊ केला आहे.
कुटुंब व आॅफिसने तिच्या ट्रान्सजेंडर असण्याला घेतलेल्या हरकतीमुळे तिने घर व आॅफिस दोन्ही सोडून दिले. पुढे दोन वर्ष सतत संघर्ष केल्यानंतर तिला सध्याचे मनाजोगे काम मिळाले आहे.
टॅक्सीमध्ये येणारे प्रवासी तिच्या कामावर खूष असतात. ते तिला नेहमीच पाच स्टारचे रँकिंग देतात. महिला प्रवाशांना तर तिच्यासोबत अधिक सुरक्षित वाटते.
मला या कामाचा अभिमान वाटतो, माझी इच्छा आहे की किमान १० ट्रान्सजेंडर या कामात यावेत, असे ती म्हणते. १० तासांच्या ड्युटीनंतर मेघना आपल्या घरी जाऊन पती व मुलासोबत वेळ व्यतीत करते.

Web Title: Just different; India's first Transgender taxi driver, Meghna Sahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.