नागपुरात न्या. हक यांच्या बदलीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:55 PM2020-02-17T23:55:19+5:302020-02-17T23:57:31+5:30
न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले.
न्या. हक यांचे मुख्यालय नागपूर होते. ते बदलवून औरंगाबाद करण्यात आले आहे. त्यामुळे वकिलांमध्ये नाराजी आहे. गेल्या महिन्यात हायकोर्ट बार असोसिएशनच्या आमसभेत या निर्णयाविरुद्ध ठराव पारित करण्यात आला होता. तसेच, मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करून हा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु, निर्णय कायम आहे. परिणामी, वकिलांच्या एका समूहाने पुन्हा निषेध आंदोलन सुरू केले आहे. त्यांतर्गत गाऊनवर पांढऱ्या फिती लावण्यात आल्या. अॅड. श्रीरंग भांडारकर हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. यापुढे गुलाबी व त्यानंतर लाल फिती लावून काम केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.