न्यायमूर्तींची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 08:59 AM2019-08-18T08:59:25+5:302019-08-18T09:00:18+5:30

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली.

Justices visits to the Dragon Palace Temple in Nagpur | न्यायमूर्तींची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट

न्यायमूर्तींची ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अ.भा. संमेलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली.
शुक्रवारी दुपारी ४ वाजता जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश बिंडाल, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोकपाल सिंग, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शबाना, जयपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महम्मद रफीक यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ड्रॅ्रगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या सर्वांनी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीसमोर वंदन केले तसेच सामूहिक बुद्धवंदनेत सहभागी झाले. अ‍ॅड. कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेसच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या विकासाची सर्व माहिती त्यांना दिली. तसेच येथे चालणाऱ्या सामाजिक, शैक्षिणक, धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती आणि मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रेरणा देत राहील, असे उद्गार न्या. राजेश बिंडाल यांनी काढले.

Web Title: Justices visits to the Dragon Palace Temple in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.