कभी किसी को मुकम्मल जहां नही मिलता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:44 PM2019-05-03T23:44:26+5:302019-05-03T23:45:02+5:30
गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गीतसंगीताचा आस्वाद रसिकांसाठी आनंद देणारा असतो. कधी तो कडाक्याच्या थंडीत ऊब देणारा तर कधी तापणाऱ्या उन्हात गार हवेची झुळुक असल्याचे जाणवते. सध्याच्या होरपळणाऱ्या उन्हात असाच काहीसा स्वरांचा गारवा रसिकांनी ‘सुनहरे नगमे’ या कार्यक्रमातून अनुभवला.
स्वरांजली कराओके ग्रुप व श्रीकांत ब्राम्हणे यांच्यातर्फे नुकताच हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गायक राज आणि शारदा लांजेवार यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे श्रीकांत ब्राम्हणे, अशोक थारोकर, अरुण येरनाल, वैभव दशपुत्रे, शारदा लांजेवार, जस्सी थारोकर, अरुणा चौधरी, संदीप मलिक आदींनी स्वरसाज चढवलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. कलावंतांनी मोहंमद रफी, किशोर कुमार, मुकेश, हेमंत कुमार, तलत महमूद, तलत अजीज यांच्या सुवर्णकाळातील गाणी तन्मयपणे सादर करून रसिकांना चिंब भिजविले. ‘याद ना जाये बिते दिनो की..., ना झट को जुल्फ से पानी..., आज उनसे पहले मुलाकात होगी..., कभी किसी को मुकम्मल जहा..., रहे ना रहे हम..., राधिके तुने बंसी चुरायी..., तेरे बिना जिंदगी से कोई..., गोरे रंग पे ना इतना गुमान कर..., लुटे कोई मन का नगर..., चलते चलते मेरे ये गीत...’ आदी एकापेक्षा एक सरस गाण्यांनी रसिक भारावले. साठ आणि सत्तरच्या दशकाची ही सफर रसिकांना सुखावून गेली.