कडवने घेतले होते ५० लाखांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:53 PM2020-07-22T23:53:13+5:302020-07-22T23:54:12+5:30

कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले.

Kadav had taken a loan of Rs 50 lakh | कडवने घेतले होते ५० लाखांचे कर्ज

कडवने घेतले होते ५० लाखांचे कर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले.
कडव २७ जुलैपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणावर संपत्तीचे दस्तऐवज जप्त केले आहेत. त्यांच्या तपासणीतून अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत. यादरम्यान त्याने बोगस दस्तऐवजाच्या माध्यमातून ५० लाखाचे कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची कुठलीही चौकशीही केली नाही. गुन्हे शाखा या प्रकरणाचाही शोध घेत आहेत. यात बँक अधिकारीही अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आतापर्यंत कडव याच्याशिवाय त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. कडव याच्या गुन्ह्यात त्याचे साथीदारही सहभागी आहेत. ते आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईपासून अलिप्त आहेत.

Web Title: Kadav had taken a loan of Rs 50 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.