कळमना-नागपूर डबलिंगसाठी रेल्वे वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:36 AM2017-10-02T00:36:39+5:302017-10-02T00:37:01+5:30
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कळमना-नागपूरदरम्यान दुसºया लाईनसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कळमना-नागपूरदरम्यान दुसºया लाईनसाठी आवश्यक असलेल्या नॉन इंटरलॉकिंगचे काम २ ते १६ आॅक्टोबर २०१७ दरम्यान करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावरील चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या अजनी, गोंदिया, इतवारी येथे समाप्त होऊन तेथूनच सुटणार आहेत. यात विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस अजनी रेल्वेस्थानकावरून सोडण्यात येणार आहे.
दपूम रेल्वेच्या कळमना-नागपूर डबलिंगसाठी नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ५८८१४ इतवारी-रामटेक पॅसेंजर, ५८८१३ रामटेक- इतवारी पॅसेंजर १३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान रद्द राहील. ५८८१० नागपूर-रामटेक पॅसेंजर आणि ५८८११ रामटेक-नागपूर पॅसेंजर ३ ते १३ आॅक्टोबरदरम्यान रद्द राहणार आहे. याशिवाय काही गाड्या आपल्या निर्धारित रेल्वेस्थानकाच्या पूर्वी समाप्त होऊन तेथूनच सुटणार आहेत. यात १८२३९ गेवरा रोड-नागपूर पॅसेंजर ३ आणि १३ आॅक्टोबरला इतवारीला समाप्त होईल. १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३ आणि १३ आॅक्टोबरला इतवारीवरून सुटेल. १८२३९ गेवरा रोड-नागपूर तसेच १२८५६ नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेस १४ आणि १५ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल. १२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुटेल. १८२४० नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस ३ ते १२ आॅक्टोबरपर्यंत इतवारीवरून सुटेल. १२८५५ बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस १३ आणि १५ आॅक्टोबरला गोंदियाला समाप्त होईल. १८२४० नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस १४ आणि १६ आॅक्टोबरला गोंदियावरून सुटेल. ११०३९ कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरपर्यंत अजनीला समाप्त होईल. ११०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अजनीवरून सुटेल. १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अजनीला समाप्त होईल.
१२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस ३ ते १५ आॅक्टोबरदरम्यान अजनीवरून सुटेल. ६८७१३ गोंदिया-इतवारी एक्स्प्रेस १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ६८७१४ इतवारी-गोंदिया मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ६८७४३ गोंदिया-इतवारी गोंदिया-इतवारी मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीला समाप्त होईल. ६८७४४ इतवारी-गोंदिया मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ६८७१६ इतवारी-गोंदिया मेमू १३, १४, १५ आॅक्टोबरला कामठीवरून सुटेल. ५८८१६ तिरोडी-इतवारी पॅसेंजर १३, १४, १५ आॅक्टोबरला तुमसरवरून सुटेल. ५८८१५ इतवारी- तिरोडी पॅसेंजर १३, १४, १५ आॅक्टोबरला तुमसरला समाप्त होईल.
५८२०५ रायपूर-इतवारी पॅसेंजर १३, १४, १५ आॅक्टोबरला तुमसरवरून सुटेल. ५८२०६ इतवारी-रायपूर पॅसेंजर १४, १५, १६ आॅक्टोबरला तुमसरला समाप्त होईल. ५८८११ टाटानगर-इतवारी पॅसेंजर १२, १३ आॅक्टोबरला दुर्गवरून सुटेल. ५८११२ इतवारी-टाटानगर पॅसेंजर दुर्गला समाप्त होईल.
ंकळमन्याला थांबविण्यात येणाºया गाड्या
१८२३७ छत्तीसगड एक्स्प्रेस ८ आॅक्टोबरला कळमना येथे १७ मिनिट थांबविण्यात येईल. २२५१२ कामाख्या-कुर्ला कर्मभूमी एक्स्प्रेस ९ आॅक्टोबरला कळमनात २ तास १० मिनिट थांबविण्यात येईल. १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेस ९ आॅक्टोबरला कळमनात १५ मिनिट थांबविण्यात येईल. १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस १० आॅक्टोबरला कळमनात १७ मिनिट थांबविण्यात येईल. १८२३७ छत्तीसगड एक्स्प्रेस १० आॅक्टोबरला कळमनात १० मिनिट थांबविण्यात येईल.