नागपुरात सहा ऋतूंवर आधारित कालिदास महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:50 PM2017-11-15T22:50:06+5:302017-11-15T22:55:41+5:30
महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : महाकवि कालिदास यांच्या ‘ऋतूसंहार’वर आधारित कालिदास महोत्सव १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. शास्त्रीय संगीत व वादन प्रेमींसाठी यंदा देबप्रिय अधिकारी, समन्वय सरकार, आस्था गोस्वामी, गुरु शमा भाटे,पं. उदयकुमार मल्लिक, बिंदू जुनेजा हे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कालिदास महोत्सवाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख अतिथी राहतील. त्यानंतर नागपूरकर रसिक सहा ‘ऋथउँछए शङआ शआएङळे ’ हा संगीतमय कार्यक्रम सादर करतील. रात्री ८.३० वाजता पूरबाई या कार्यक्रमांंतर्गत कोलकाता येथील देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व सतार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.
१८ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता मन वृंदावन या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन कार्यक्रमांंतर्गंत आस्था गोस्वामी यांना ऐकता येणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता पुण्याच्या नादरुप ग्रूपच्या गुरु शमा भाटे आणि त्यांची चमू कथ्थक नृत्यनाटिका सादर करतील. रात्री ९ वाजता नवी दिल्लीच्या पंडित उदयकुमार मल्लिक यांच्या धमारवरील धृपद धमार गायनाचा कार्यक्रम होईल तर शेवटच्या दिवशी सायंकाळी ऋतूचक्र या शास्त्रीय गायन कार्यक्रमांतर्गंत मुंबईच्या पं. रोणू मजुमदार आणि पं.सतीश व्यास यांच्यातील जुगलबंदी ऐकायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजता वसंतरास या कार्यक्रमांतर्गंत ओडिसी समूह नृत्यामध्ये भोपाळच्या बिंदू जुनेजा आणि त्यांच्या चमूचे नृत्य पाहायला मिळणार आहे. तर रात्री ८.४५ वाजता ऋतूरंग कार्यक्रमांतर्गंत पुण्याचे संजीव अभ्यंकर आणि मुंबईच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनातील जुगलबंदी अनुभवता येईल. हा कार्यक्रम नि:शुल्क राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
मनपातर्फे ग्रीन बससह विशेष बस सुविधा
कालिदास महोत्सवाकरिता नागपूरकर रसिकांसाठी मनपाच्यावतीने वर्धा मार्ग व अमरावती मार्ग येथून दोन विशेष वातानुकूलित ग्रीन बसची तर स्वावलंबीनगर , पारडी, कळमेश्वर, हजारी पहाड, कोराडी, पिपळा फाटा आणि बेसा येथून रेशीमबागपर्यंत विशेष बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.