कमलाकर धारप यांना जीवनव्रती पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 08:46 PM2019-05-21T20:46:46+5:302019-05-21T21:00:36+5:30
विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली आहे. ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली आहे. ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. २५ मे रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य व महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रजनीशकुमार शुक्ल यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
नारद जयंती निमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार तसेच स्तंभलेखकांचा सन्मान करण्यात येतो. यंदा प्रिंट मीडियातून अनंत कोळमकर, इलेक्ट्रॉनिक मीडियातून कुमार टाले व स्तंभलेखकांतून कर्नल अभय पटवर्धन यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यंदा पुरस्कारांचे दहावे वर्ष आहे. शंकरनगर येथील साई सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे विदर्भ प्रमुख अतुल पिंगळे यांनी दिली. यावेळी संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम, सहप्रचार प्रमुख ब्रजेश मानस उपस्थित होते.