कळमेश्वर एमआयडीसी परिसर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:26+5:302021-07-23T04:07:26+5:30
कळमेश्वर शहरासह तालुक्यात सर्वदूर गुरुवारी सकाळी ११.३० वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरात जमा झालेले पावसाचे पाणी वाहून जाण्यास ...
कळमेश्वर शहरासह तालुक्यात सर्वदूर गुरुवारी सकाळी ११.३० वाजतापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरात जमा झालेले पावसाचे पाणी वाहून जाण्यास अवराेध निर्माण हाेत असल्याने, शहरातील बसस्थानक परिसर व आठवडी बाजारातील काही घरांमध्ये तसेच तालुक्यातील मोहपा शहरासह कोहळी, लिंगा लाढाई, उपरवाही, गोंडखैरी व धापेवाडा या गावांमधील काही घरांमध्ये रस्त्यावरील पावसाचे शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली हाेती. शिवाय, पाण्यामुळे घरातील साहित्य भिजल्याने त्यांचे नुकसानही झाले. शहरालगतच्या नदी व नाल्यांना पूर आल्याने कळमेश्वर एमआयडीसी परिसर जलमय झाला हाेता. युनिजिलस लेबाॅरटरीज नामक कंपनीमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. तालुक्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
...
केळवदच्या ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी
केळवद (ता. सावनेर) गावाच्या मध्य भागातून गेलेल्या नदीवर १३४ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी पुलाचे बांधकाम केले हाेते. त्या पुलावरून आजही रहदारी सुरू आहे. हा पूल अरुंद व कमी उंचीचा असून, त्याच्या दाेन्ही बाजूचे संरक्षक कठडे फार पूर्वीच तुटले आहेत. गुरुवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याने या नदीला पूर आला हाेता. पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने एकाच गावातील दाेन भागाचा आपसातील संपर्क तुटला हाेता. पुरामुळे शेतातील घराकडे परत येत असलेले शेतकरी व मजुरांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले. केळवद शिवारातील काही शेतामध्ये याेग्य निचरा न झाल्याने पाणी साचले हाेते. त्यामुळे पिके पाण्याखाली आली हाेती.