कळमेश्वर प्रजासत्ताक दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:40 AM2021-02-05T04:40:03+5:302021-02-05T04:40:03+5:30

कळमेश्वर : नगर परिषद व बाजार चाैक येथे नगराध्यक्ष स्मृती ईखार यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ज्योत्स्ना ...

Kalmeshwar Republic Day in excitement | कळमेश्वर प्रजासत्ताक दिन उत्साहात

कळमेश्वर प्रजासत्ताक दिन उत्साहात

Next

कळमेश्वर : नगर परिषद व बाजार चाैक येथे नगराध्यक्ष स्मृती ईखार यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, मुख्याधिकारी स्मिता काळे, नगरसेवक महादेव ईखार, वनिता भलावी, सत्यवान मेश्राम, सुवर्णा मानकर, अश्विनी धोगडी, ललित देशमुख, मनोज शेंडे, धनराज देवके, प्रगती मंडल, सिंधू धरपाळ, अमित दहीकर, थानसिग पटले, डाॅ. घनश्याम मक्कासरे, ज्योती काकडे, मीना शिरभाते, सुनील चुनारकर, वर्षा कामडी, सुनीता मंडलिक, डॉ. राजीव पोतदार, अरविंद रामावत, सरजू मंडपे, फत्तेसिंग मरडवार प्रशांत ईखार, आशिष सौदागर, पुंडलिक धार्मिक, जयंत अढाऊ, सतीश नांदे, मनोज क्षीरसागर, बबन वानखेडे, खुशाल मंडलिक आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालय प्रांगणात तहसीलदार सचिन यादव यांनी ध्वजाराेहण केले. पोलीस स्टेशन येथे ठाणेदार आसिफराजा शेख यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी पाेलीस पथकाने मानवंदना दिली. तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था येथे अध्यक्ष बाबा कोढे यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी उपाध्यक्ष आशिष देशमुख, अरविंद रामावत यांच्यासह संचालक व नागरीक उपस्थित होते. नगर काॅंग्रेस कमिटी कार्यालयात सरजू मंडपे, नगर परिषद उपकार्यालयात उपाध्यक्ष ज्योत्स्ना मंडपे, कळमेश्वर नागरीक संस्था येथे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, भाजप कार्यालयात ज्येष्ठ नागरिक रामदास काठोळे, शिवसेना कार्यालय येथे कमलाकर पाल, पंचायत समिती येथे सभापती श्रावण भिंगारे, न. प. माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण सभापती सत्यवान मेश्राम यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी मुख्याध्यापिका पौर्णिमा मेश्राम, तुषार खेरडे, आशिष देशमुख उपस्थित होते. तसेच शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, सामाजिक संस्थेत ध्वजाराेहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

Web Title: Kalmeshwar Republic Day in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.