कळमेश्वर तालुक्यात ७८.९६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:23+5:302021-01-16T04:13:23+5:30

कळमेश्वर : तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात एकूण ८,३८० मतदारांपैकी ६,६१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या टप्प्यात ७८.९६ टक्के ...

In Kalmeshwar taluka 78.96 percent polling | कळमेश्वर तालुक्यात ७८.९६ टक्के मतदान

कळमेश्वर तालुक्यात ७८.९६ टक्के मतदान

Next

कळमेश्वर : तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानात एकूण ८,३८० मतदारांपैकी ६,६१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शेवटच्या टप्प्यात ७८.९६ टक्के मतदान झाले असून यात सर्वात जास्त मतदान ८४.५१ टक्के सेलू (गुमथळा) तर सर्वात कमी मतदान ७४.६५ टक्के कोहळी (मोहळी)ग्रामपंचायतसाठी झालेले आहे.

४ ग्रामपंचायतमधील १३ वाॅर्डातील एकूण ३८ जागांसाठी एकूण ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शुक्रवारी १४ मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात कोहळी (मोहळी) ७४.६५ टक्के, सोनेगाव (पोही) ८०.०९ टक्के, सेलू (गुमथळा) ८४.५१ टक्के तर सावंगी (तोमर) साठी ८१.०० टक्के मतदान झाले.

४ ग्रामपंचायतींमधील ४०९७ स्त्री मतदारांपैकी ३२१७ तर ४२८३ पुरुष मतदारांपैकी ३४०० मतदारांनी मतदान केले. तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सचिन यादव यांचे मार्गदर्शनात निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गडड्म, निवडणूक लिपिक बिलाल खान, लिपिक संदीप जाधव, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक जंगले, नंदकिशोर खंडाळ, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वाघाडे, मोरेश्वर तांबेकर, क्षेत्रीय अधिकारी विनोद मेरखेडे, हर्षल निकोसे यांनी काम पाहिले. निवडणुकीदरम्यान असामाजिक तत्त्वांकडून शांतता भंग होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: In Kalmeshwar taluka 78.96 percent polling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.