कळमेश्वरची ऐतिहासिक रथयात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:32+5:302021-04-28T04:09:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : शहरातील जाेडमारुती मंदिरात रामनवमी ते हनुमान जयंती या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले ...

Kalmeshwar's historic rath yatra canceled | कळमेश्वरची ऐतिहासिक रथयात्रा रद्द

कळमेश्वरची ऐतिहासिक रथयात्रा रद्द

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर : शहरातील जाेडमारुती मंदिरात रामनवमी ते हनुमान जयंती या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन केले जात असून, रथयात्रेने या कार्यक्रमांचा समाराेप केला जाताे. सर्वत्र प्रसिद्ध असलेली ही रथयात्रा यावर्षी बुधवारी (दि. २८) आयाेजित करावयाची हाेती. मात्र, काेराेना संक्रमणामुळे ही रथयात्रा रद्द करण्यात आली आहे. या यात्रेत काेराेनामुळे सलग दुसऱ्या वर्षी खंड पडल्याची माहिती आयाेजकांनी दिली.

कळमेश्वर शहरातील या प्रभू श्रीराम व हनुमानाच्या रथयात्रेला २५५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या यात्रेत विदर्भासाेबतच मध्य प्रदेशातील हजाराे भाविक सहभागी होतात. ही रथयात्रा दरवर्षी हनुमान जयंतीनंतर दोन दिवसांनी आयाेजित केली जाते. रामनवमीपासून धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. कार्यक्रम व रथयात्रेच्या याेग्य नियाेजनासाठी रथयात्रा उत्सव समिती स्थापन केली जाते. ही रथयात्रा मंदिरापासून बाजार चौकापर्यंत काढण्यात येते. यावेळी भजन, कीर्तन, भारूड, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम आयाेजित केले जातात. जोड मारुती मंदिराजवळ दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. ही दहीहंडी आकर्षणाचे केंद्र असते. शहरवासीयांसाठी ही रथयात्रा आकर्षण व आस्थेचे केंद्र आहे.

या रथयात्रेला रात्री ११ वाजता सुरुवात केली जाते. रथ भ्रमण करत बाजार चौकात हनुमान मंदिराजवळ उभा केला जातो. जोड मारुती चौकात दहीहंडीचे आयाेजन केले जाते. तरुणांचे नृत्य, कसरत व दांडपट्ट्यांच्या प्रात्यक्षिकांचेही आयाेजन केले जाते. दुसऱ्या दिवशी बच्चेकंपनींची धम्माल असते. तमाशा व जागरण कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.

...

रथाची विधिवत पूजा

रथयात्रा रद्द करण्यात आल्याने बुधवारी रात्री जागेवरच प्रभू श्रीराम, हनुमान व रथाची अर्चना पाठक व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते विधिवत पूजा केली जाईल. यावेळी नगराध्यक्ष स्मृती इखार, उपाध्यक्ष ज्याेत्स्ना मंडपे, मुख्याधिकारी स्मिता काळे उपस्थित राहणार आहेत. रथाचे शहरात भ्रमण केले जाणार नाही. मागील वर्षी ही रथयात्रा ९ व १० एप्रिल राेजी आली हाेती. तत्पूर्वी २४ मार्च राेजी शासनाने लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि रथयात्रा रद्द करण्यात आली.

Web Title: Kalmeshwar's historic rath yatra canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.