हिंदू महासभेतर्फे कमल हसन व राजस्थान सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:44 AM2019-05-16T11:44:44+5:302019-05-16T11:45:18+5:30
अभिनेता कमल हसन यांनी चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभिनेता कमल हसन यांनी चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे. तसेच राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित शालेय पाठ्यपुस्तकातील धडा काढून टाकला. यावर राजस्थान सरकारच्या शिक्षणंमत्र्यांनी हास्यास्पद विधान केले आहे.
राजस्थान सरकारचा निर्णय देशद्रोही लोकांसाठी उत्तेजन व देशभक्तांसाठी मानहानी ठरणारा आहे, असे मत हिंदू महासभेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या दोन्ही प्रकरणाचा निषेध केला आहे.