कमला नेहरू महाविद्यालयाने जपला सामाजिक दायित्त्वाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:08+5:302021-07-16T04:07:08+5:30

- गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचा पुढाकार : प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी केले रक्तदान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमतच्यावतीने राज्यभरात सुरू ...

Kamala Nehru College is a beacon of social responsibility | कमला नेहरू महाविद्यालयाने जपला सामाजिक दायित्त्वाचा वसा

कमला नेहरू महाविद्यालयाने जपला सामाजिक दायित्त्वाचा वसा

Next

- गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचा पुढाकार : प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमतच्यावतीने राज्यभरात सुरू असलेल्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या रक्तसंकलन अभियानात गुरुवारी कमला नेहरू महाविद्यालयाच्या प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या सामाजिक कर्तव्याची जाण ठेवत रक्तदानाचे कार्य केले.

गोविंदराव वंजारी फाऊंडेशन व लोकमतच्यावतीने कमला नेहरू महाविद्यालयात रक्तदान शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन अमर सेवा मंडळ शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. स्मिता वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी वंजारी व संस्थेचे सचिव आ. ॲड. अभिजित वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. वरभे, कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक, उपप्राचार्य डॉ. प्रदीप दहीकर, एनएसएसचे समन्वयक प्रा. डॉ. निनाद काशिकर, प्रा. डॉ. मृणाल वलिवकर, एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. प्रवीण सोनटक्के उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, एनसीसी कॅडेट्स व इतर विद्यार्थ्यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. यावेळी प्रा. डॉ. भजनी, प्रा. देवेंद्र मनगटे, प्रा. डॉ. बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. मृणाल वलिवकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. चर्जन यांनी मानले.

..............

Web Title: Kamala Nehru College is a beacon of social responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.