जिल्ह्यात काेराेना आलेख चढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:09 AM2021-03-08T04:09:44+5:302021-03-08T04:09:44+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणाचा आलेख हळूहळू चढत आहे. जिल्ह्यात रविवारी ...

Kareena graph on the rise in the district | जिल्ह्यात काेराेना आलेख चढतीवर

जिल्ह्यात काेराेना आलेख चढतीवर

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणाचा आलेख हळूहळू चढत आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. ७) विविध ठिकाणी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये काटाेल तालुक्यात ३० रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, कळमेश्वर तालुक्यात २५, हिंगण्यात १४ तर उमरेड तालुक्यात ११ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. हे संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्यासाेबतच उपाययाेजनांचे पालन करणे गरजेचे आहे.

काटाेल तालुक्यात रविवारी एकूण १३८ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली. यात ३० जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील २४ रुग्ण काटाेल शहरातील रहिवासी असून, सहा रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. नव्याने पाॅझिटिव्ह आढळून आलेल्या काेराेना रुग्णांमध्ये काटाेल शहरातील सरस्वती नगरात राहणारे चार, रामदेव बाबा ले-आऊटमधील तीन, काळे चौक, पंचवटी, आययूडीपी, शनी चौक, रमण चांडक नगर येथील प्रत्येकी दोन, फैलपुरा, संचेती ले-आऊट, जानकी नगर, पोहनकर ले-आऊट, ठोमा ले-आऊट, अनसूयापुरम, जैन मंदिर येथील प्रत्येकी एक तसेच तालुक्यातील खानगाव येथील चार आणि जुनेवाणी व फेटरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

कळमेश्वर तालुक्यातील २५ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात शहरातील १० तर ग्रामीण भागातील १५ रुग्ण आहेत. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील १० रुग्ण असून, तालुक्यातील पानउबाळी येथील सहा, घोगली (पेपर मिल) येथील चार, तेलगाव, दाढेरा, खापरी, सुसुद्री व पिल्कापार येथील प्रत्येकी एक रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे टेस्टमध्ये स्पष्ट झाले आहे.

हिंगणा तालुक्यातील काेराेना रुग्णांमध्ये रविवारी १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ४,३७२ झाली असून, यातील ४,००८ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, १०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यात नव्याने आढळून आलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये वानाडाेंगरी शहरातील आठ तर डिगडोह, हिंगणा, सुकळी (बेलदार), नीलडोह, मोहगाव व नागलवाडी प्रत्येकी एक रुग्ण आहे.

उमरेड तालुक्यात शनिवारी करण्यात आलेल्या टेस्टचे रिपाेर्ट प्राप्त झाले असून, यात ११ नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या नवीन रुग्णांमध्ये उमरेड शहरातील दाेन तर तालुक्यातील नऊ रुग्ण आहेत. तालुक्यात आजवर एकूण १,२८७ काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील १,१६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय, ४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Kareena graph on the rise in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.