काेराेना हिंगणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:27+5:302021-03-15T04:09:27+5:30
रामटेक तालुक्यातही रविवारी २४ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. या नवीन रुग्णांमध्ये रामटेक शहरातील नेहरू वाॅर्ड व शास्त्री वाॅर्डातील ...
रामटेक तालुक्यातही रविवारी २४ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. या नवीन रुग्णांमध्ये रामटेक शहरातील नेहरू वाॅर्ड व शास्त्री वाॅर्डातील प्रत्येकी एक तर तालुक्यातील मनसर येथील सात, करवाही व हिवरा (बेंडे) येथील प्रत्येकी तीन, कांद्री (माईन्स) व परसाेडा येथील प्रत्येकी दाेन, शीतलवाडी, सिंदेवाही, देवलापार, वडांबा व टांगला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या २४ रुग्णांमुळे तालुक्यातील काेराेना रुग्णांची एकूण संख्या १,२६० झाली असून, यातील १,०७० रुग्णांनी काेराेनावर मात केली तर ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
काटाेल तालुक्यात रविवारी १०४ नागरिकांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, त्यातील १२ जण काेराेना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नवीन रुग्णांमध्ये काटाेल शहरातील १० रुग्ण असून, ग्रामीण भागातील दाेन रुग्ण आहेत. यात काटोल शहरातील जानकी नगर येथील सहा, धंतोली येथील दोन, तर पंचवटी व दोडकीपुरा येथील प्रत्येकी एक तसेच तालुक्यातील नांदोरा व डोरली (भिंगारे) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.