नरखेड काटाेलमध्येही काेराेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:38+5:302021-05-21T04:09:38+5:30
सावनेर तालुक्यात २३ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यात चार रुग्ण सावनेर शहरातील तर १९ रुग्ण ग्रामीण भागातील ...
सावनेर तालुक्यात २३ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यात चार रुग्ण सावनेर शहरातील तर १९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. काटाेल तालुक्यात गुरुवारी ३४० नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले असून, यात १७ जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यात काटाेल शहरातील नऊ तर ग्रामीण भागातील आठ रुग्ण आहेत. या आठ रुग्णांमध्ये कचारीसावंगा व येनवा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमधील प्रत्येकी चार रुग्ण आहेत. उमरेड तालुक्यात १८ रुग्ण आढळून आले असून, यात शहरातील तीन तर ग्रामीण भागातील १५ रुग्ण आहेत.
कुही तालुक्यात १९८ नागरिकांचे काेराेना टेस्ट रिपाेर्ट प्राप्त झाले असून, यातील आठ जणांचे रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आहेत. यात अंबाडी येथील तीन, मांढळ व तितूर येथील प्रत्येकी दाेन व साळवा येथील एक रुग्ण आहे. कन्हान (ता. पारशिवनी) कोविड सेंटर अंतर्गत १३५ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले असून, यातील सहा जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या भागात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ९३ आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. याेगेश चाैधरी यांनी दिली.
...
मृत्यूचे प्रमाण घटले
ग्रामीण भागातील काेराेना संक्रमणासाेबतच मृत्यूचे प्रमाण घटत चालले असून, काेराेनावर मात करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी एकूण २८ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील नऊ, ग्रामीण भागातील आठ तर बाहेरच्या जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यात आजवर २६२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण ११,६०१ पैकी १०,४५६ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. कन्हान येथे आजवर ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात ३,३४२ पैकी ३,१५५ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे.
...
रामटेक तालुक्यात चार पाॅझिटिव्ह
रामटेक तालुक्यात गुरुवारी चार रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी दाेन रुग्ण आहेत. तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णांची संख्या ६,४४० झाली असून, यातील ६,०९५ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. सध्या ३४५ ॲक्टिव्ह रुग्ण असून, आजवर १२३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी संयुक्तरीत्या दिली.