काेराेनाने पुन्हा वाढविली प्लास्टिक कचऱ्याची डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:26+5:302021-07-12T04:06:26+5:30

मेहा शर्मा नागपूर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१८ पासून प्लास्टिकवर निर्बंध लादले व त्यानुसार सुरू झालेल्या कारवाईने प्लास्टिकवर नियंत्रण ...

Kareena relapses plastic waste right back pain | काेराेनाने पुन्हा वाढविली प्लास्टिक कचऱ्याची डाेकेदुखी

काेराेनाने पुन्हा वाढविली प्लास्टिक कचऱ्याची डाेकेदुखी

Next

मेहा शर्मा

नागपूर : महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१८ पासून प्लास्टिकवर निर्बंध लादले व त्यानुसार सुरू झालेल्या कारवाईने प्लास्टिकवर नियंत्रण आले हाेते. मात्र मार्च २०२० पासून काेराेनाचा प्रकाेप वाढला तसे प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे पुन्हा प्लास्टिक विराेधात कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जगभरात ‘प्लास्टिक मुक्त जुलै’ ही माेहीम सुरू झाली आहे. त्यानुसार नागपूर महापालिकेनेसुद्धा या चळवळीचा भाग हाेण्याचा निर्धार केला आहे व येत्या दाेन-तीन दिवसात शहरात तशी माेहीम राबविली जात आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) २०१९ च्या सर्वेक्षणानुसार काेराेना काळात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. नागपूर शहरात दरराेज दरराेज ४५.९६ टन प्लास्टिकचा कचरा निर्माण हाेताे. शहरातील एकूण घनकचऱ्यामध्ये प्लास्टिकचा ७ टक्के वाटा आहे. तसे सर्वाधिक प्लास्टिक कचरा निघणाऱ्या मुंबईच्या तुलनेत नागपूर शहर खाली आहे पण तेही काही कमी नाही. शहरातून दरराेज १००० ते १२०० टन घन कचरा बाहेर पडताे. शहरात प्रतिव्यक्ती दरवर्षी ५३ किलाे प्लास्टिकचा वापर करताे. याचा अर्थ दरवर्षी ३०० दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण हाेताे. पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी म्हणाले, प्लास्टिकवर लावलेले निर्बंध कागदावर आहेत. काेराेनापूर्व काळात प्रशासनाने प्लास्टिकवर निर्बंधासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही दिसत हाेते पण काेराेना नंतर सिंगल युज्ड प्लास्टिक वापराचे प्रमाण पुन्हा वाढले. प्रशासनातर्फे मधामधात प्लास्टिक विक्रेता व साठवण गाेदामामध्ये धाड टाकून कारवाई केली जाते पण खरी गरज प्लास्टिक उत्पादकांवर कारवाई करण्याची आहे तरच प्लास्टिक कचरा थांबविणे शक्य हाेईल. जाेपर्यंत सिंगल युज्ड प्लास्टिकचे उत्पादन हाेत राहील, ताेपर्यंत बाजारात त्याचा वापर सुरुच राहील, असे स्पष्ट मत चटर्जी यांनी व्यक्त केले. नागपूर किंवा काेणत्याही शहरात नाल्या व पाईपलाईन चाेक हाेण्यासाठी प्लास्टिकचा कचरा कारणीभूत ठरताे. नुकत्याच झालेल्या पावसानंतर ही स्थिती दिसूनही आली आहे.

दीड दाेन वर्षापासून सामना करीत असलेल्या काेराेना काळात मास्क आणि ग्लाेव्हजचा वापर प्रचंड वाढला आहे. या दाेन्हीमध्ये प्लास्टिकचे अंश असतात, ज्यांचे विघटन सहजासहजी हाेत नाही. मास्क व ग्लाेव्हज जैविक कचऱ्याचा भाग असले तरी दुर्दैवाने मनपातर्फे गाेळा हाेणाऱ्या घनकचऱ्यातच ताे जमा केला जाताे आणि भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये त्याचा भार वाढला आहे. या काळात महापालिकेची प्लास्टिकविराेधी माेहीम शिथिल पडली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे म्हणाले, काेराेनापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्युसेन्स कन्ट्राेल विभाग (एनसीडी) च्या सहकार्याने प्लास्टिकविराेधी कारवाई चालली हाेती मात्र काेराेनाचा परिणाम या कारवाईवर झाला. मात्र आम्ही पुन्हा एकदा ही माेहीम सुरू करणार असल्याचे निपाणे यांनी स्पष्ट केले.

प्लास्टिक मुक्त जुलै ही वैश्विक चळवळ आहे आणि लक्षावधी लाेक या माेहिमेचा भाग झाले आहेत. प्लास्टिक प्रदूषणापासून रस्ते, समुद्र मुक्त करायची आहेत, ज्यामुळे चांगला समाज निर्माण हाेईल. या माेहिमेद्वारे घरी, शाळेत व प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक वापर बंद करण्याच्या कल्पनांना चालना मिळेल.

Web Title: Kareena relapses plastic waste right back pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.