भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कीर्तीदा अजमेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:43 AM2017-09-15T00:43:22+5:302017-09-15T00:43:33+5:30
भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नव्या पदाधिकाºयांची गुरुवारी घोषणा करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नव्या पदाधिकाºयांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. महिला आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. कीर्तीदा अजमेरा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दिव्यांग आघाडीच्या अध्यक्षपदी अमोल वाळके यांची निवड झाली आहे. शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी ही घोषणा केली. हे नवे पदाधिकारी रविवारी होणाºया कार्यकारिणी बैठकीत सहभागी होतील.
डॉ.कीर्तीदा अजमेरा यांची अध्यक्षपदाची ही दुसरी ‘टर्म’ आहे. याअगोदर ही धुरा महापौर नंदा जिचकार यांच्याकडे होती. महिला आघाडीच्या महामंत्रिपदी नीता ठाकरे, सारिका नांदूरकर, संध्या ठाकरे, नीलिमा बावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर संपर्क महामंत्री म्हणून सीमा ढोमने, लता येरखेडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसरीकडे दिव्यांग आघाडीचे महामंत्री म्हणून शेषराव मांडवकर, रमेश घापोडकर, नोषाध शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, निवड करण्यात आलेल्या पदाधिकाºयांपैकी अनेक जण नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना पक्षात पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पदाधिकाºयांनी केला आहे.