कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार
By admin | Published: November 2, 2016 02:20 AM2016-11-02T02:20:51+5:302016-11-02T02:20:51+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क चे महत्त्व विचारात घेता या मैदानाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत विकासाचा नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणर आहे. यामुळे कस्तूरचंद पार्कचा लूक बदलणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मैदानाचा वापर विविध कार्यक्रम व प्रदर्शनासाठी केला जातो. परंतु वापरानंतर मैदान पूर्ववत केले जात नाही. तसेच मैदानावर व परिसरात अतिक्रमण होते. यामुळे मैदानावर कचरा साचतो. याला आळा बसावा, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली.
नवीन विकास आराखड्यात मैदानाच्या वापरासंदर्भातील नियमात सुधारणा केली जाणार आहे. तसेच मैदानावर परिसरात अतिक्रमण होणार नाही. यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यासोबतच परिसराचे सौंदयींकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)
अतिक्रमण रोखण्यासाठी भरारी पथक
कस्तूरचंद पार्क व परिसरात व्यावसायिक मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करतात. याचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तहसीलदार(नझुल) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक दर दोन- तीन दिवसांनी कस्तूरचंद पार्कची पाहणी करून अतिक्रमण होणार नाही. याची खबरदारी घेणार असल्याची माहिती सचिन कुर्वे यांनी दिली.
अतिक्रमण हटविले
कस्तूरचंद पार्क व लगतच्या फूटपाथवर पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले होते. यामुळे मैदानात घाणपाणी व कचरा साचत असल्याने मैदानाला बकाल स्वरूप आले होते. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी मैदावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी तहसीलदार (नझुल) यांच्या नेतृत्वातील पथकाने मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. सेंट जोसेफ स्कूलच्या बाजूने कस्तूरचंद पार्क मैदानाच्या फू टपाथवर व मैदानात पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी अतिक्रमण केले होते. बाजूलाच नारळपाणी विक्रे त्यांची दुकाने होती. विक्रेते साहित्य व नारळांचा साठा ठेवण्यासाठी मैदानाचा वापर करीत होते. सर्वावर कारवाई करून मैदानाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.