कस्तूरचंद पार्कची कोंडी!
By Admin | Published: October 30, 2016 02:33 AM2016-10-30T02:33:41+5:302016-10-30T02:33:41+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागातील कस्तूरचंद पार्क लगतच्या फूटपाथवर व मैदानाच्या आतील भागात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले आहे.
अतिक्रमणाचा विळखा चारही बाजूने फेरीवाल्यांची दादागिरी प्रशासनाचे दुर्लक्ष कशासाठी ?
नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागातील कस्तूरचंद पार्क लगतच्या फूटपाथवर व मैदानाच्या आतील भागात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण के ले आहे. यामुळे मैदानात घाणपाणी व कचरा साचत असल्याने या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने याला वेळीच आळा घालून या मैदानाचा ऐतिहासिक वारसा जपावा, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे.
सेंट जोसेफ स्कूलच्या बाजूने कस्तूरचंद पार्क मैदानाच्या फू टपाथवर व मैदानात पोहे, नारळपाणी व चहा विक्रे त्यांनी अतिक्रमण केले आहे. पोहे विक्रे त्यांनी सलग सहा दुकाने थाटली आहेत. बाजूलाच नारळपाणी विक्रे त्यांची चार दुकाने आहेत. विक्रेते साहित्य व नारळांचा साठा ठेवण्यासाठी मैदानाचा वापर केला जातो. कचरा मैदानात उघड्यावर टाकला जाते. तसेच घाणपाणी फेकले जाते. यामुळे मैदानाला बकाल स्वरूप आले असून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
संविधान चौकाच्या बाजूला मैदानाच्या फूटपाथवर वाहन दुरुस्तीची दुकाने आहेत. तसेच चौकाचौकात खेळणी विकणाऱ्यांनीही मैदानाच्या संरक्षण भिंतीलगत पाल टाकून राहुट्या तयार केल्या आहेत. सकाळी व सायंकाळी पोहे खाणाऱ्यांची मोठी गर्दी असते.
ग्राहकांची वाहने मैदानाच ठेवली जातात. परंतु महापालिकेचा प्रवर्तन विभाग व जिल्हा प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.(प्रतिनिधी)