कस्तूरचंद पार्क अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:14 AM2017-11-13T01:14:53+5:302017-11-13T01:15:05+5:30

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तूरचंद पार्क येथील भोसलेकालीन निर्मित बारादरी (सुंदर महाल) च्या ठिकाणी अतिक्रमण करणाºयांचे आश्रय बनला आहे.

 Kasturchand Park is famous for encroachment | कस्तूरचंद पार्क अतिक्रमणाच्या विळख्यात

कस्तूरचंद पार्क अतिक्रमणाच्या विळख्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तूरचंद पार्क येथील भोसलेकालीन निर्मित बारादरी (सुंदर महाल)

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. परंतु शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तूरचंद पार्क येथील भोसलेकालीन निर्मित बारादरी (सुंदर महाल) च्या ठिकाणी अतिक्रमण करणाºयांचे आश्रय बनला आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने सीताबर्डी किल्ल्यासमोरील या ऐतिहासिक वास्तूचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
प्रशासनाकडून येथे अतिक्रमण करणाºयांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांना पडला आहे. कस्तूरचंद पार्कवर लागणारी सर्कस व इतर कार्यक्रमांच्या आयोजनाला विरोध दर्शविणाºया सामाजिक संघटनाही यासंदर्भात गप्प आहेत. एवढेच नव्हे तर कस्तूरचंद पार्क वरील रावण दहनामुळे व फाटक्यांच्या दुकानामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची तक्रार करणाºया संघटनांचेही याकडे दुर्लक्ष आहे.
रावण दहानाच्यावेळी फोडण्यात येणाºया फटाक्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी हेरिटेज समितीने महालाच्या सभोवताल टिनाचे शेड तयार करण्यास सांगितले होते. या अटीवर या कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु आता काही परप्रांतीय कु टुंबानी महालातच मुक्काम ठोकला आहे. महालाच्या पिल्लरला साड्या बांधून पाळणे तयार केले आहे. एवढेच नव्हे तर या वास्तूच्या आजूबाजूला दगड-विटांच्या चुलीवर स्वयंपाक केला जातो. यामुळे या वास्तूचे नुकसान होत नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

Web Title:  Kasturchand Park is famous for encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.