‌भाड्याच्या खोलीत शिजला दरोड्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:57+5:302021-07-10T04:07:57+5:30

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीने एक दिवसापूर्वीच नागपूर ...

कटShijala robbery plot in a rented room | ‌भाड्याच्या खोलीत शिजला दरोड्याचा कट

‌भाड्याच्या खोलीत शिजला दरोड्याचा कट

Next

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीने एक दिवसापूर्वीच नागपूर गाठले होते. सूत्रधार कृष्णा पांडे याची प्रेयसी वंदना हिने घेतलेल्या भाड्याच्या खोलीत त्यांनी मुक्काम ठोकला अन् तेथेच दरोड्याचा कट शिजवला. वंदना (वय २७) हिच्या तसेच अन्य आरोपींच्या चाैकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वंदनाचा या दरोड्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी तिला बुधवारी अटक केली. न्यायालयाने तिला १० जुलैपर्यंत कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी वंदनाची बारकाईने चाैकशी सुरू केली आहे. आरोपींना ओळखतच नसल्याचे सांगून वंदना प्रारंभी रेटून खोटे बोलली. मात्र, पोलिसांनी तिला तिचा कृष्णा पांडेसोबत अवनी ज्वेलर्समध्ये रेकी करतानाच व्हिडिओ दाखविल्यानंतर ती बोलती झाली. तिने त्याच्याशी आपले प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. परंतु, दरोड्याच्या कटाची आपल्याला माहिती नव्हती, असे सांगून या गुन्ह्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचाही तिने स्पष्ट इन्कार केला होता. मात्र, पोलिसांनी कसून तपास केला आणि वंदनाचा खोटेपणा उघड करणारी धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार, वंदनाने कृष्णासाठी भाड्याची एक खोली घेऊन ठेवली होती. तो येथे आला की ते दोघे तेथे राहायचे. सात दिवसापासून कृष्णा येथे मुक्कामी होता. त्याने त्याच दरम्यान अवनी ज्वेलर्ससह आणखी काही ठिकाणचे ज्वेलर्स बघितले. मात्र, त्या ठिकाणी पकडले जाण्याचा धोका असल्याने कृष्णाने अवनी ज्वेलर्समध्ये दरोडा घालण्याचे ठरवले आणि आपल्या साथीदारांना रविवारी बोलावून घेतले. त्यानुसार ४ जुलैला साथीदार नागपुरात पोहोचले. त्यांनी वंदनाने कृष्णासाठी घेतलेल्या भाड्याच्या खोलीत खाणे-पिणे केले. तेथेच दरोड्याचा कट शिजवला आणि सोमवारी दुपारी दरोडा घातला. या खोलीच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी आदल्या दिवशी काही तरुण तेथे मुक्कामी होते, या माहितीला दुजोरा दिला असून, त्या मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले. शिवाय या खोलीतून पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या चीजवस्तू जप्त केल्या. त्यात कार आणि दुचाकीच्या नंबरप्लेटही आहेत. त्या चोरीच्या वाहनाच्या असाव्यात, असा संशय आहे. हे सर्व भक्कम पुरावे दाखविल्यानंतर वंदनाची आता बोलती बंद झाली आहे. तिने दिशाभूल करण्याचे थांबविले असून, दरोड्याच्या कटासोबतच आरोपींबाबतही महत्त्वाची माहिती पोलिसांपुढे कथन केल्याचे समजते.

---

रायपुरातील साथीदारही सहभागी

या दरोड्यात सूत्रधार कृष्णा पांडे, पिंकू यादव, वीरेंद्रकुमार सुखदेव आणि दीपक त्रिपाठी यांचे रायपूर (छत्तीसगड)मधील काही साथीदारही सहभागी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांनीच आरोपींना छपरा-खसारा येथे प्रेम लॉज भाड्याने घेण्याचा सल्ला दिला होता, अशीही माहिती आहे. पोलीस या माहितीची खातरजमा करीत आहेत.

---

तो व्हिडिओ व्हायरल

अवनी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी काय काय केले, त्याचा भक्कम पुरावा ठरलेला घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत सर्वात जास्त आक्रमक कृष्णा पांडेच दिसत आहे. त्यानेच प्रारंभी सराफा दुकानदार आशिष नावरे यांचे तोंड आणि गळा दाबला आणि नंतर त्यानेच मारहाण करून त्यांना साथीदारांच्या मदतीने बंधक बनविल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

---

Web Title: कटShijala robbery plot in a rented room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.