काठेवाडी मेंढपाळ निघाले परतीच्या प्रवासाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:07 AM2021-06-21T04:07:26+5:302021-06-21T04:07:26+5:30

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : विदर्भातील गाेधन कमी हाेत असल्याने शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, गुजरातमधील कच्छ ...

The Kathewadi shepherd set out on his return journey | काठेवाडी मेंढपाळ निघाले परतीच्या प्रवासाला

काठेवाडी मेंढपाळ निघाले परतीच्या प्रवासाला

Next

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : विदर्भातील गाेधन कमी हाेत असल्याने शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, गुजरातमधील कच्छ व साैराष्ट्र भागात चाराटंचाई जाणवत असल्याने तेथील काठेवाडी मेंढपाळ त्यांच्या शेळ्या-मेंढ्या व गुरांसह विदर्भात दाखल हाेतात. पावसाला सुरुवात झाल्याने या मेंढपाळांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भिवापूर तालुक्यातील पाच महिन्याचा मुक्काम आवरता घेत परतीचा प्रवास सुरू केला आहे.

काठेवाडी मेंढपाळ दरवर्षी डिसेंबर, जानेवारीमध्ये नागपूर जिल्ह्यातील विविध भागात दाखल हाेतात. त्यानंतर फेब्रुवारी, मार्चमध्ये रबी पिके निघाल्यानंतर काही शेतकरी शेणखतासाठी त्यांच्या शेतात या शेळ्यामेंढ्या बसवण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे काठेवाडी मेंढपाळांना पैसा व त्यांच्या शेळ्यामेंढ्यांसह गुरांना मुलबक चाराही मिळताे. या काळात मेंढपाळांची भटकंती सुरूच असते. शेतकऱ्यांनी जर शेळ्यामेंढ्या त्यांच्या शेतात बसवल्या नाहीत तर काठेवाडी मेंढपाळ गावालगतच्या माेकळ्या जागेवर त्यांचा मुक्काम ठाेकतात.

विशेष म्हणजे, हे मेंढपाळ दरवर्षी त्यांच्या कुंटुंबीयांसह येतात. यात त्यांच्या लहान मुलामुलींचाही समावेश असताे. त्यांच्या मुक्कामाचे ठिकाण दर आठवड्याला बदलत असते. कच्छ व साैराष्ट्र भागातून आपण पायी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड पर्यंत जाताे आणि पावसाला सुरुवात हाेताच त्या ठिकाणाहून पायी परतीच्या प्रवासाला सुरुवात करताे, अशी माहिती या काठेवाडी मेंढपाळांनी दिली.

गृहाेपयाेगी साहित्य व मुलांच्या वाहतुकीसाठी त्यांच्यासाेबत उंटही असतात. येणे व जाण्याच्या प्रवासात आपण पाण्याची साेय असलेल्या ठिकाणी रात्रभर मुक्काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुले व कुत्री रानात चारा खात असलेल्या शेळ्यामेंढ्यांवर सतत लक्ष ठेऊन असतात.

....

एकरी २,५०० रुपये खर्च

एका कळपात किमान १,३०० ते १,५०० शेळ्यामेंढ्या असतात. मेंढपाळ या शेळ्यामेंढ्या शेतात बसवण्यासाठी शेतकऱ्यांकडून रात्रभराचे (सायंकाळी ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत) २,५०० रुपये घेतात. रात्रभरात शेळ्यामेंढ्यांची विष्टा, मूत्र शेतात पडते. त्याचे गुरांच्या तुलनेत शेळ्यामेंढ्यांच्या लेंडीचे खत उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी याला प्राधान्य देतात. त्यानंतर शेतकरी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात करतात.

...

दिवाळी ते पावसाळा भटकंती

काठेवाडी मेंढपाळ महाराष्ट्रात येण्यासाठी दिवाळीनंतर तर परतीचा प्रवास पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू करतात. या काळात त्यांची सतत भटकंती सुरू असते. लहानग्यांपासून माेठ्यांपर्यंत सर्व जण कडाक्याची थंडी, रखरखते उन्ह, पाऊस अंगावर घेतात. यासह वादळातही त्यांचा मुक्काम उघड्यावरच असताे. शेळ्यामेंढ्या पालनावर आपली उपजीविका अवलंबून असते, अशी माहिती या मेंढपाळांनी दिली.

===Photopath===

170621\1821img_20210616_172750.jpg

===Caption===

मेंढपाळ परतीच्या प्रवासाला नीघाले

Web Title: The Kathewadi shepherd set out on his return journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.