काटोल व भंडारा पंचायत समितीचा ‘लाखमोलाचा’ गौरव; संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण

By कमलेश वानखेडे | Published: February 5, 2024 07:26 PM2024-02-05T19:26:12+5:302024-02-05T19:26:33+5:30

संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते.

Katol and Bhandara Panchayat Samiti's Lakhmola Award Distribution of Sant Gadge Baba Gram Swachhta Abhiyan Award | काटोल व भंडारा पंचायत समितीचा ‘लाखमोलाचा’ गौरव; संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण

काटोल व भंडारा पंचायत समितीचा ‘लाखमोलाचा’ गौरव; संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्काराचे वितरण

नागपूर: संत गाडगे बाबा यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. स्वच्छतेमुळे आरोग्यमान उंचावते हा मूळ मंत्र घेऊन संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासोबत स्वच्छ करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजलक्ष्मी बिदरी यांनी केले. यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कारांतर्गत राज्य व विभागीय स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या पंचायत समितींना पुरस्कार देऊन विभागीय आयुक्तांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. वनामती येथील सभागृहात नागपूर विभागातील राज्य व विभागीय स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या काटोल पंचायत समितीला एकूण २८ लाख रुपयांचा तर भंडारा पंचायत समितीला एकूण २६ लाख रुपयांचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी वनामतीच्या संचालक डॉ. मिताली सेठी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त विवेक इलमे, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी, विस्तार अधिकारी छत्रपाल पटले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी केले तर संचालन दिनेश मासोदकर, आभार उपायुक्त विवेक इलमे यांनी मानले.

असे आहेत पुरस्काराचे मानकरी

  • -यशवंत पंचायत राज अभियान (२०२०-२१) द्वितीय पुरस्कार पं. स. पोभुर्णा चंद्रपूर, तर तृतीय पुरस्कार पं. स. कामठी नागपूर यांना देण्यात आला. सन २०२०-२१ चा राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार पंचायत समिती भंडारा यांना देण्यात आला.
  • -संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान (२०२०-२१) विभागस्तरावर प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत खैरी (वलमाझरी) पं. स. साकोली, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत खापरी (केणे) पंचायत समिती नरखेड, तृतीय पुरस्कार संयुक्तपणे ग्रामपंचायत दिभना, पंचायत समिती गडचिरोली, ग्रामपंचायत नवेझरी पंचायत समिती तिरोडा.
  • -स्व. वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत कोटंबा पंचायत समिती सेलू तर स्व. बाबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कार ग्रामपंचायत बेलगाव पंचायत समिती कुरखेडा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत मंगी (बु) पंचायत समिती, राजुरा यांना देण्यात आला.
  • -संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान (२०१९-२०) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये विभागस्तरीय प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत येणिकोनी पंचायत समिती नरखेड, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत सीतेपार पंचायत समिती मोहाडी, तृतीय पुरस्कार संयुक्तपणे ग्रामपंचायत देवलगाव पंचायत समिती अर्जुनी (मोर), ग्रामपंचायत कोसंगी पंचायत समिती मूल.
  • -स्व. वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत अरततोंडी पंचायत समिती कुरखेडा, स्व. बाबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत खुर्सापार पंचायत समिती काटोल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत बाजरवाडा पंचायत समिती, आर्वी यांना देण्यात आला.
  • -याप्रसंगी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत (२०१९-२०) उत्कृष्ट कामगिरी केलेले पंचायत समिती वरोऱ्याचे पशुधन पर्यवेक्षक राहुल हिवे, वर्धा येथील सेलू तालुक्याचे आरोग्य सेवक गजानन थुल, गडचिरोली जिल्हा परिषदेचे नरेश कनोजिया, पंचायत समिती भंडाऱ्याचे ग्रामसेवक जयंत गडपायले, नागपूरचे शेषराव चव्हाण (२०२०-२१) मिर्झापूर पंचायत समिती आर्वीचे राजू शेंदरे, पंचायत समिती आर्वीचे विनोद राठोड, गडचिरोली येथील जिल्हा परिषद शाखा अभियंता आर. एस. सामदेवे, पंचायत समिती पोंभुर्णा सोमेश्वर पंधरे, सहायक लेखाधिकारी भेजेंद्र मसराम या सर्वांचा सत्कार विभागीय आयुक्त बिदरी यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: Katol and Bhandara Panchayat Samiti's Lakhmola Award Distribution of Sant Gadge Baba Gram Swachhta Abhiyan Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर