काटोल, नरखेडची कोरोना साखळी तुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:17+5:302021-05-05T04:14:17+5:30
सावनेर/कळमेश्वर/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही /रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंगळवारी किंचित दिलासा मिळाला. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ...
सावनेर/कळमेश्वर/ काटोल/ नरखेड/ उमरेड/ कुही /रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला मंगळवारी किंचित दिलासा मिळाला. सोमवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार १३ तालुक्यात १६७४ नवीन रुग्णांची भर पडली तर, २१ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,२०,४८४ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ८८,०९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी २,४३४ रुग्ण बरे झाले. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३०,३१५ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १३९ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील ३५ तर ग्रामीण भागातील १०४ रुग्णांचा समावेश आहे. खापा आरोग्य केंद्रांतर्गत दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यात कोरोनाची साखळी अबाधित आहे. काटोल तालुक्यात ४६५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ४० तर ग्रामीण भागातील ९७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारीसावंगा केंद्रांतर्गत ७६ तर येनवा केंद्रांतर्गत २१ रुग्णांची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात १६१ रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील २० तर ग्रामीणमधील १४१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,८५६ तर शहरात ६८५ इतकी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावअंतर्गत येणाऱ्या गावात १०, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात (१२२), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात (५) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात चार रुग्णांची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात ८९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील १६ तर ग्रामीण भागातील ७३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात गोंडखैरी येथे १० तर धापेवाडा येथे सर्वाधिक ८ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यातील विविध केंद्रांवर २१३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथे ५, मांढळ (४), वेलतूर (१०), साळवा (४) तर तितूर येथे ३ रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ४४ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील १३ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,१०१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ४,७८२ कोरोनामुक्त झाले तर, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३१९ इतकी आहे. उमरेड तालुक्यात ४८ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३१ तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात पाच मृत्यू
हिंगणा तालुक्यात ४९६ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथील २४, टाकळघाट (१५), कान्होलीबारा, रायपूर, किन्ही धानोली व हिंगणा येथे प्रत्येकी ६, नीलडोह (५), गुमगाव, वागदरा, डिगडोह प्रत्येकी ४, कवडस (३), वडधामना, खैरी मोरे, देवळी पेंढरी, मांडवघोराड प्रत्येकी २ तर इसासनी, गिदमगड, गौराळा, मोहगाव ढोले, अडेगाव, वटेघाट, सालईदाभा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १०, ६५७ झाली आहे. यातील ८,२०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, २३० रुग्णांचा मृत्यू झाला.